मी ........................ झालो असतो

Submitted by थॅनोस आपटे on 24 December, 2018 - 20:58

आताचे रूक्ष क्षेत्र हा माझा चॉईस कधीच नव्हता. मी लेखक झालो असतो असे मला वाटते. तुम्हाला असे काही वाटते का ? इथे चर्चा करा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त धागा.
मी कॉन मॅन झालो असतो - अजूनही होऊ शकतो.

मला प्राथमिक शिक्षिका व्हायचं होतं., मराठी विषयाची
अभियन्ता झाले नसते तर शिक्षण क्षेत्रात गेले असते ..

आत्ता जे काम करते आहे तेही भारी आहे, त्यामुळे नो रीग्रेट्स Happy

स्वतःला काय व्हायचे होते ते लिहायचं की मेरीच गिनो लेखक झाले असते का नाही त्याबद्दल लिहायचंय Happy

मी एक आळशी हाउसवाईफ झाले असते. Happy
अजुनही कधी कधी फार्फार इच्छा होते जॉब वैगेरे सोडुन मस्तपैकी फुल्ल टाईम गृहिणी व्हायची Lol
पण ही इच्छा दोन चार दिवसच टिकते. Happy

मी एका कोल्हापूर सांगली मिरजेच्या शेतकऱ्याची (पण श्रीमंत शेतकरीच Proud ) बायको किंवा मग कोकणातली सोज्वळ सून होण्याची स्वप्न पहायचे. (अति कादंबऱ्या आणि सिनेमाचा प्रभाव). प्रत्यक्षात अमेरिकन कम्पनीची नोकरी आणि अर्ध आयुष्य युरोपमधे घालवणार्या नवऱ्याची बायको झाले. अजूनही शेतात वगैरे काम करायची आणि कोकणात राहायची खुमखुमी आहेच, पण शेत आणि कोकण/खेड्याशी दूरदूरचे सुद्धा लागेबांधे नाहीत, मग पाऊस पडला की मला शेतांची स्वप्न पडतात Happy

आयुष्यात बरंच काय करावसं वाटतं, आणि बरंच काय व्हायचं पण होतं पण शेवटी जगण्यासाठी लागणारे चार पैसे अशा रूक्ष नोकऱ्या करूनच मिळतात, तरीपण मला अजूनही एक चांगला ट्रेडर व्हायचं आहे शेअर मार्केट मधला, सकाळी दहा पर्यंत ट्रेडिंग करून बक्कळ पैसे कमवायचे आहेत उरलेल्या वेळात आमच्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करायचे आहेत,सायकलवर कोकण फिरायचं आहे, दुपारी पंखा फुल्ल स्पीडवर ठेऊन आवडतं पुस्तक वाचत पडायचं आहे, रात्रीची लाईट गेली असताना भुतांच्या गोष्टीचे फड ओटीवर जमवायचे आहेत, पहिल्या वादळी पावसात खेकडी, मासे पकडायला जायचंय, त्याच गावच्या जुन्या मित्रांसोबत टूपणी खेळता खेळता राज्य दूरवर न्यायची आहे, आणि दमल्यावर देवळाच्या पारावर बसून गुलाबछडी खायची आहे.

मी कोण झालो असतो हे बदलत असते.

तूर्तास मी डॉक्टर झालो असतो, पेशंट्सना दिलेली वेळ काटेकोरपणे पाळली असती. तसेच ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त झाल्यावर काय? हा प्रश्न पडला नसता.
हा कालच आलेला विचार.

सकाळी दहा पर्यंत ट्रेडिंग करून बक्कळ पैसे कमवायचे आहेत

>>

चुकून झालाच तर एक फुकटचा सल्ला: १० नंतरच करा! चिक्कार पैसा कमवता येतो

चुकून झालाच तर एक फुकटचा सल्ला: १० नंतरच करा! चिक्कार पैसा कमवता येतो>>> रोज कमवता येतो काय? मी या क्षेत्रात उतरायचा विचार करतोय. भीती पण वाटते आमच्या इथे एक जण आहे त्याने एका दिवसात 1लाख गमावले

धागा-प्रतिसाद वाचून भरपूर विचार केला पण मी काय झाले असते/ काय व्हायची माझी इच्छा होती जी पूर्ण झाली नाही असे काहीच आठवेना...

मग आठवलं कि त्या त्या गोष्टी वाचताना मला शेरलॉक व्हावं अस वाटलं होतं किंवा डोरीयन ग्रे... एवढंच काय परवा शार्प ऑब्जेक्टस् बघताना "छ्या आपल्याला स्केटिंग यायला पाहिजे होत राव!" वाटलं Lol Lol किंवा अंधाधून बघून आल्यावर "च्यक् कमितकमी पियानो वाजवायला तरी शिकायला पाहिजे होतं"...

छान धागा.
लहान असताना टिचर टिचर, डॉक्टर, गृहीणी बनण हे खेळ आवडायचे. नंतर मला झाडा-पानांत रमायला आवडू लागल. कृषी क्षेत्रात जाता आल असत तर गेले असते. पण तेव्हा ती सोय आमच्याकडे नव्हती.

मी एस.टी. ड्रायव्हर झालो असतो..! लहाणपणी माझे स्वप्न होते की मोठा झाल्यावर एस.टी चा. ड्रायव्हर व्हायचे.. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते... Lol Lol Lol

मला archaeology, palaeography, indology यात करियर करायची इच्छा होती

मला काॅलेज प्रोफेसर व्हायला आवडलं असतं...
पण शिकवण्याचा छंद प्रायवेट क्लासला शिकवून जोपसतो...
दुधाची तहान ताकावर तर ताकावर...

मला खरं तर पायलट व्हायचं होतं. अजूनही प्रवासात आवर्जून खिडकीची सीट घेतो. बहुधा मी मागल्या जन्मी गरूड वगैरे सारखा पक्षी असावा.

पण नेमस्त जीवन शैली हेच बरोबर असते हा अलिखित संस्कार , जीवन जसे येत गेले त्यातला रूढ विचाराप्रमाणे नियतीने दिलेला सर्वोत्कुष्ठ पर्याय स्वीकारत जाण्यासाठी पुरेसा ठरला. पण तरी सुद्धा त्याबद्दल पश्चात्ताप बिलकुल नाही.
आणि बरोबरच्या सवंगड्यांच्या आमंत्रणाला डावलून संगीत क्षेत्रात न आल्याचेही दु:ख्ख नाहिये...