दादाच्य गोष्टी - २

Submitted by अननस on 20 December, 2018 - 21:32

दादा बरोबर आम्ही अनेक गोष्टींची चर्चा करत असू. दादा आम्हाला सर्व धर्मातील गोष्टी, संतांचे जीवन प्रसंग सांगत असे.

एक दिवस विषय असा निघाला कि कडव्या धार्मिकतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या निवारण करण्यासाठी सर्व धर्म समभावाचीच काच धरली पाहिजे...

पंड्या म्हणाला, 'सगळेच धर्म शांती, प्रेम, अहिंसा सांगतात, मग या सगळ्या समस्या कशाला?'

चिनू म्हणाला, 'सर्व धर्म समभाव रामकृष्ण - विवेकानंदांनी सव्वाशे वर्ष पूर्वीच सांगितला, मग परत त्यावर चर्चा कशाला?'

दादा ने थोडावेळ विचार केला... पण तो या विषयावर काही बोलला नाही.. आम्ही पण झाडाखाली संध्याकाळच्या मंजूळ वाऱ्यामध्ये बसलो होतो. शुक्राची चांदणी आकाशात तेजाने झळकत होती.

थोड्यावेळ असाच वारा खात बसल्यावर दादाने आपले मौन सोडले आणि म्हणाला, "त्यामध्ये खरी समस्या अशी आहे कि रामकृष्ण - विवेकानंदांनी सर्व धर्मसमभाव सव्वाशे वर्षांपूर्वी सांगितला असला तरीही आमची समाज मान्यता, कांचन आणि कामिनी हे न सोडता मिळणार सर्वधर्म समभाव समाजाला हवा आहे.. "

मग, पंड्याने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, 'कदाचित ख्रिस्ती धर्मच, ज्याचे प्रचारक संन्यासाश्रमाचे प्रतिपादन करत नाहीत, तेच समाजाला सुखी ठेवू शकतील.,

त्यावर चिनू म्हणाला, 'नाही, इस्लाम बहुपत्नीत्वाला विरोध करत नाही, त्याच्या माध्यमातून समाज सुखी होईल'

अश्रफ म्हणाला, 'हिंदू धर्म गायन, वादन कला धर्मविरोधी मानत नाही त्यामाध्यमातूनच समाज सुखी होईल'..

ओजस म्हणाला, 'धर्म तरी कशाला हवा? ज्याला ज्यातून आनंद-सुख मिळविते त्याने ते करावे ?'

त्यावर तेजसने विचारले, ' ओजस म्हणतो तशा समाजात श्रेष्ठ कोणाला म्हणावे?, सर्वांच्या सुखासाठी पैसे, साधन सामुग्री पुरवणाऱ्या व्यक्तीला का? त्याला कोणते हक्क असावे ? '

अशीच काही काळ चर्चा चालू असताना, दूरच्या देवळातून संध्याकाळची आरती आणि घंटेचे सूर ऐकू येऊ लागले. आता घरी जायची वेळ झाली आम्हाला कळले होते.

आज त्या गोष्टीला इतकी वर्ष झाली, अजूनही या चर्चेचे उत्तर आम्हाला सापडले नाही.

Group content visibility: 
Use group defaults

छान Happy
चर्चेचे उत्तर लवकर सापडेल असे वाटत ही नाही.

पूर्वी मराठी मध्ये लिहायला अवघड जात असेल तर गुगल मराठी लेखन वापरून पहा.. खूप पटकन फोनेटिक लिखाण करता येते.. मराठीत जसे शब्द आहेत तसे इंग्रजी स्पेलिंग करून पटकन ( उदाहरणार्थ - भारत = bhaarat) लिहिता येते

https://www.google.co.in/inputtools/try/