नकळत

Submitted by naidu suvarna p... on 17 December, 2018 - 07:02

नकळत ..
आज काही वेगळच वाटतयं. शरीराने इथे असलो तरी मन मात्र बाहेर रेंगाळल आहे. नजरेला दिसतोय, फक्त समोरचा दरवाजा. का मी इतकी वाट पाहत आहे. तेही खात्री नसताना. का वाटत काहीतरी नवीन घडेल. खर सांगायचं तर नवीन काहीही नसत. व्यक्ती बदललेली असते . भावना कमी अधिक प्रमाणत त्याच असतात. पण आपण मात्र स्वप्नाळू होतो. खरतर मला स्वतःलाही खात्री नाही कि मी जो विचार करत आहे. तोच विचार समोरच्या व्यक्तीने केला असेल का? करत असेल का ? हे मन फार वेगळच असत. किती विचार असतात. पण एक मात्र छान आहे कि खर काहीही घडो न घडो पण मन स्वतःला वेगळ्या जगात मात्र नक्कीच घेऊन जात, उभारी देत राहत.
ती येईल अस कालपासून वाटतय. खर तर तिला मी जास्त ओळखत नाही. जुजबी बोलन झाल केवळ. तस इतक हरकून जायचं कारणही नाही. पण .... वाटतय ती नक्की येईल. तस तीच माझ्याकडे काहीही काम नाही. तरीही वाटत ती माझ्याकडे येऊन जाईल. पुन्हा विचार येतो का येईल . काही कामच नाही म्हणल्यावर नाही यायची. पण मनापासून वाटत एकदा याव तिने . मला तिला पुन्हा एकदा पहायचं आहे. तीच मनापासून हसण मला पहायचं आहे. खूप विचार करण्यासारखं वेड लावण्यासारख सौंदर्य नसल तरी डोळे फार बोलके आहेत. तिचा हाच गुण मला आवडला. अगदी डोळ्यात डोळे घालून बोलते . पाहिल्यावेळेस आली तेव्हा तिला मी वेळ दिलाच नाही. मी माझ्या कामात किती व्यग्र होतो. नंतर या अस सांगून रिकामा झालो . त्यावेळी काहीही प्रश्न न करता ती मान हलवून निघून गेली. त्या क्षणाला मला वाटलहि नाही कि मी तिची अशी वाट पाहीन.
नंतर मात्र ती आली तेव्हा मी तिला बसण्याची खूण केली. चक्क माझ्या शेजारी बसली. मी बोललेलं किती समजल, कळल नाही पण मी मात्र तिच्या या बिनधास्त वागण्याने चकित झालो. ती अशी पटकन शेजारी बसली त्यावेळी तिला फक्त तिचे काम महत्वाचे हे नक्कीच मला जाणवत होत. पण माझी नजर क्षणात आजूबाजूला फिरली. माझे सहकारी माझ्याकडे पाहत होते. त्यांना वाटत असेल आमची जुनी ओळख आहे . तिच्या शंका दूर केल्याने ती फार आनंदी होती. आभार मानून जायला उठली. पुढे जाऊन एकदा मागे पाहिलं अस वाटल. पण नाही ती सरळ निघून गेली. मी पण माझ्या कामात गढून गेलो. मला वाटल ती फोन करेल बोलेल पण नाही तस काहीच झाल नाही.
तस पाहायला गेल तर क्षणाची ओळख पण त्यादिवशी राहून राहून तिचा भास होत होता. कस पाहिलं न तिने माझ्याकडे. चोरटे भाव नव्हते नजरेत. त्यामुळेच तर मला तिची आठवण येऊ लागली. अगदी चातकासारखी वाट पाहतोय. मी आज कामात रमण्याचा कितीही प्रयत्न केला तरी माझ मन मात्र तिची वाट पाहत बाहेर रेंगाळल आहे. नजर तर क्षणक्षणाला दाराकडे वळत आहे. आज ती येणार अस सारखच वाटत आहे. जर आलीच तर काय करू हा प्रश्न आहेच कि. काय बोलू कळेना. पण आज सकाळपासून मी एकच गाण सारख गुणगुणत आहे.
" आज उनसे पहेली मुलाकात होगी , फिर आमने सामने बात होगी हिर होगा क्या, क्या पता क्या खबर."
खर तर माझा स्वभाव पाहता मी असं कधी कोणाची वाट वगैरे पहिली नाही. आपल काम आणि घर यापलीकडे कधी विचार केलाच नाही. खर सांगायचं तर मी स्वतःला कामात फार गुंतून घेतलं आहे. सुट्टीच्या दिवशीही मी काम करत राहतो. का तर मला आवडत. खूप लोकांना पाहतो मैत्रिणींशी गप्पा करताना. मला नेहमी वाटायचं काय हे लोक का असे वागतात. काय गरज मैत्रिणीची. आपल बर आहे. आपल काम भल आणि आपण भले. काम कराव घरी जाव. यापलीकडे मी कधी विचार केलाच नाही. पण तिला पाहून थोडा फुललो . अगदी अस वाटतय वठलेल्या वृक्षाला अचानक पालवी फुटू लागली. हो खरच. कारण आज खूप वेळा मी आरशात पाहिलं स्वतःला . नंतर मला स्वतःवरच हसू आल. काय हे किती स्वप्नाळू झालो मी. तिला कल्पना तरी असेल का? कि मी तिचा इतका विचार करत आहे.
माझ मन कुठेच लागेना. पण काय करणार काम करणे गरजेचे आहेच. सर्व आशा अपेक्षा गुंडाळून मी कामाला लागलो खर, पण मनाचं काय करायचं ते अजूनही रेंगाळत आहे बाहेर. खूप झापल मी स्वतःलाच काय हे कसला हा अल्लडपणा. पण ऐकेल ते मन कसलं. पुरे झाली वाट पाहन किती लोक येतात जातात. तशीच ती सुद्धा . इतका काय तिचा विचार करायचा हे मी मनाला समजवल पण ते काहीही ऐकायला तयार नाही. मी मात्र सर्व विचार दूर सारून कामाला सुरवात केली. माझ्यातला मी पुन्हा कामात गुंग झालो. कामात स्वतःला झोकून देण हा माझा स्वभाव . ऑफिसला येऊन दोन तास झाले तरी आपण कामाला सुरवात केली नाही या विचाराने पूर्ण लक्ष कामात एकवटल. ठरलेलं टार्गेट पूर्ण करायचं होत. गेलेला वेळ भरून काढायचा ठरवल . एका तासात बऱ्यापैकी काम उरकल . एका विषयवार खूप योग्य निर्णय घ्यायचा होता. त्यामुळे थोडं वाचन चालू केल. अगदी मनापासून वाचत होतो. थोड्यावेळापूर्वी अनिश्चित गोष्टीत गुंतलेला मी पूर्वपदावर आलो. एका प्रकारे हे बर झाल . कामात गुंतून गेलो. टेबलवर टकटक झाली तेव्हा समोर कोणीतरी उभ आहे याच भान आल. अरेच्या किती गर्क झालो मी कामात.
जिची सकाळपासून वाट पाहत होतो ती पुढ्यात उभी. मला माझा आनंद लपवता आलाच नाही. पण काय बोलाव हेच मुळी कळेना . तरीही उसन अवसान आणून मी प्रश्न केला बोला काय काम काढल माझ्याकडे. ती सहज हसली. नजर माझ्या चेहऱ्यावरच स्थिर ठेऊन म्हणाली खर तर माझ काम झाल आहे. त्यादिवशी तुमचे आभार मानायचे राहून गेले. तशी आज मी दुसर्या कामानिमित्त आले होते म्हटलं तुमचे आभार मानून जावे. तिच्या बोलण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत मी तिला सरळ सांगितलं. तुमच काम आटोपलं कि चहा घेऊ आपण. ती हलकेच हसली. ठीक आहे म्हणून निघून गेली. मला माझच आश्चर्य वाटू लागल . सकाळपासून नक्की काय बोलायचं हे सुचत नव्हते आणि आता काय तर सरळ चहा घेऊ सांगून टाकल. तीच तर मला काहीच कळत नव्हत. हो , नाही अस काहीच न बोलता फक्त स्मित करून गेली. " त्यादिवशी तुमचे आभार मानायचे राहून गेले." अस का म्हणाली ? माझे आभार मानलेले विसरली कि, तिलाही मला भेटावस वाटल. मला खरच काही कळेना .
नेमक काय कराव हे माझ मलाच सुचेना . चहा घ्यायचं सांगितलं पण कुठे ? किंवा तिला कस शक्य होईल हा विचार आलाच नाही. संपूर्ण वीस मिनिटे फक्त घालमेल झाली. काहीही सुचेना म्हणून मी गाडीत जाऊन बसलो. तिचा फोन आला. चहा घ्यायलाच पाहिजे का? मला उशीर होत आहे. आज शक्य नाही होणार. पुन्हा आले तर घेऊ . सगळ्या अपेक्षेवर क्षणात पाणी पडल्यासारखं वाटल. पण मी काहीही बोलत नाही हे पाहून तिने पुन्हा तेच वाक्य उच्चारलं. यावेळी मात्र मी तिला सांगितलं मी गाडीत बसून वाट पाहत आहे. १० मिनिटाने काही फरक पडणार नाही. मला आजच चहा घ्यायचा आहे. मला वाटल यायची नाही पण तस झाल नाही. मी सांगितल्या प्रमाणे बाईसाहेब गाडीत येऊन बसल्या आणि सांगितल मला थोड लवकर जायचं आहे. मी काहीच बोललो नाही तेव्हा तिने आरश्यातून माझ्याकडे पाहिलं. मी सुद्धा आरशातूनच तिच्याकडे पाहत होतो. मग काय लगेच नजर दुसरीकडे वळवली. मी विचार करू लागलो अगदी नजर स्थिर ठेऊन बोलणारी हि व्यक्ती नजर का वळवली काय कारण. शांतता पसरली क्षण भर. काही तरी बोललं पाहिजे म्हणून मी तीला विचारल, बोला कुठे घेऊन जाणार मला. त्यावर फक्त एक नजर तिने माझ्याकडे पाहिलं. काय सांगू आता तिच्या ह्या नजरेनेच तर मी घायाळ झालो होतो. त्यामुळेच तर तिची भेट व्हावी. तिला जाणून घ्यावे हा एकच ध्यास लागला होता. मी काहीच बोलत नाही म्हणून सरळ म्हणाली चहासाठी आपण निमत्रण दिल आहे, तेव्हा पहा कुठे चहा घ्यायचा. जवळच्या हॉटेल मध्ये गेलो तिने म्हणल्याप्रमाणे फक्त चहा घेतला आणि मी मात्र ज्यूस घेतला. दोघेही समोरासमोर होतो. पण काय बोलावे हे सुचेना. माझ लक्ष्य नसताना ती मला पाहत होती. आणि मी हि तेच करत होतो. अगदीच दोन चार वाक्य बोलण झाल असेल पण का कुणास ठाऊक खूप काही कळल अस वाटल. मी सहज तिला " तुम्ही खूप छान दिसता" असा मेसेज केला. खर तर आज केलेलं हे दुसर धाडस . तिने मेसेज पाहिला व लगेचच चला निघूया म्हणाली. मला तीच हे वागण कळल नाही. मला उशीर होतोय चला म्हणाली. मी मात्र तिचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न केला पण मला नक्की काहीच अंदाज बांधता येईना. मला खात्री झाली मेसेज वाचून चिडली. पण आता विचार करून काय फायदा . मी तर मेसेज पाठवला होता.
ती उठली आणि चालू लागली. मला तर वाटल आता गाडीत बसणार नाही. का पाठवला मी मेसेज. खरच चूक केली. किती छान बसली होती माझ्यासमोर . माझ्या न कळत मला पाहत होती. नजरानजर झाली कि अगदी गोंधळून जात होती. खरच मी मेसेज पाठवायला नकोच होता. काय करू आता झाले ते झाले. विचारुपण शकत नाही. म्हणून तिच्या पाठोपाठ मी निघालो . गाडीचा दरवाजा उघडला. तर ती काहीही न बोलता गाडीत बसली. मला आता तरी गप्प बसावे अस वाटत होते तरीही शांतात भंग करण्यासाठी काहीतरी बोलणे गरजेचे होते काय बोलावे हा विचार सुरु असतानच पाहू तुमचा हात दाखवा अस माझ्या तोंडून निघालं . विशेष म्हणजे कसलाही विचार न करता तिने हात पुढे केला. व म्हणाली भविष्य कळत का तुम्हाला? मला तीच हे वाक्य ऐकून हसू आल. पण मी म्हणालो हो स्पर्शावरून सांगतो मी भविष्य. तिने माझ्या हातावर हात ठेवला . अगदी दोन सेकंद . किती छान वाटल हे मी व्यक्त करू शकत नाही. जीव घेणी शांतता होती दोन मिनिटा पूर्वीची आणि आता काहीच घडलं नाही अस वातावरण. अशी आमची पहिली भेट.
तिला हवे तिथे सोडले आणि निघालो. पण खूप काळजी वाटत होती . पुन्हा बोलेल का ? भेटेल का? खूप विचारात मी ऑफिसमध्ये गेलो. आजचा दिवस खूप छान पण होता. आणि नको त्या धाडसामुळे त्रस्त करणाराही होता. किती विचार केले मी. वाटत होत इथून जाई पर्यंत हि काहीही बोलणार नाही. नंतर मात्र पुन्हा कधीच येणार नाही. खूप त्रस्त झालो. किती वेळ उलघाल चालली होती मनाची. पण माझे मलाच कळेना कधीच कोणाशी अस न बोलणारा मी अस का वागलो? काय झाल मला. का तिची आठवण यावी. का तिने आजच यावे. का भेट व्हावी. सर्व प्रश्नच प्रश्न.
ठरवल काहीही झाल तरीही तिच्यामनात नेमक काय चालल आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. भले पुढे ती जो निर्णय घेईल तो मान्य करू पण माझा मेसेज वाचून अस अबोल राहून तीच जाण मला फार अस्वस्थ करून गेल आहे. न राहवून मी तिला पुन्हा मेसेज केला. राग आला का माझा. माफ करा मी असा मेसेज करायला नको होता. शिवाय हात दाखवा हे सुद्धा फारच झाल. खूप आगाव सारख वागलो का मी. खरच मला माफ करा.
मेसेज पाठवून एकदाचा मोकळा झालो. आता लक्ष्य सतत मोबाईल वर . आज कळल मला कोणी आपल्याला मेसेज केला व आपण पटकन उत्तर दिल नाही कि किती घालमेल होते. माझा मेसेज वाचून काय प्रतिक्रिया येईल याचा मला जास्त ताण आला होता. कदाचित ती उत्तरही देणार नाही. वाचून विषय सोडून देईल . प्रश्न , प्रश्न आणि फक्त प्रश्न ?
पण जे घडलं ते वेगळच होत. मेसेज वाचून तिचा फोन आला. तिने एक प्रश्न केला. मला चहाची ऑफर करण्याचे काय कारण होते. मी म्हणालो मला मैत्री करायची होती. त्यावर ती जे काही म्हणाली ते ऐकून माझ्या कानावर माझाच विश्वास बसेना. " ती म्हणाली मैत्रीच ना ? मग मैत्रिणीचा हात हातात घेतला तर कुठे बिघडलं. खूप आनंद झाला तर अश्या गोष्टी घडतात. इतका विचार करायचं काहीच कारण नाही. शिवाय तुमच्या नजरेस मी सुंदर वाटले हेच सांगितलं ना." आता आपण मित्र आहोत. कायम मैत्री टिकवू या. आणि हो तुम्हाला भेटून खूप छान वाटल. तुमचा हा स्पष्ट वक्तेपणा मला फार आवडला. मनात एक आणि वागायचे एक असे वागणारे हे जग आहे. पण जे काही वाटल ते स्पष्ट बोलणारी लोक कमी आहते. मला आवडेल तुमची मैत्री. एवढ बोलून तिने फोन बंद केला. अक्षरशः उडालोच. खात्री व्हावी म्हणून स्वतःला चिमटा घेऊन पाहिलं.
तिने फोन बंद केला खरा पण फक्त काम आणि काम एवढच माहित असलेला मी कामच विसरून गेलो. आजूबाजूची गडबड रोजचीच होती. पण मला आता हि गडबड नकोशी वाटू लागली. सतत जाणवू लागलय तीच पाहन, तिचा अगदी क्षणाचा स्पर्श, तीच सहजपणे माझी मैत्री मान्य करण. किती किती वेळ फक्त तिचाच विचार चालू होता. माझ्या मनावर जणू तीच राज्य सुरु झाल. " सावर रे मना , सावर रे मना " अस म्हणावं कि काय अस वाटू लागल.
मैत्री तर झाली होती पण ती कितपत टिकणार हे माहित नव्हत. एकदिवस तिचा फोन आला. नेहमीचे प्रश्न, त्यावर दिलेली तिरकस उत्तर हे चालू असतानाच मी सांगितलं हॉस्पिटलमध्ये जाव लागणार आहे. का ? काय झाल? सर्व ठीक आहे ना ? माझ पुढच काहीही न ऐकता फक्त प्रश्न करत राहिली. तीच बोलण संपल्यावर मी तिला सांगितलं मला कदाचित उद्या हार्ट स्पेशालीस्ट कडे जावे लागेल. ठीक आहे म्हणाली. तीच अस तुटक बोलण मला अस्वस्थ करत होत. हिला काहीच कस वाटल नाही. एखादी विचारते कोणते डॉक्टर काही गंभीर नाही ना . पण हिने सरळ ठीक आहे म्हणून फोन बंद केला. अपेक्षा केल्या कि त्रास हा होणारच. तशी तिच्याकडून मी काही अपेक्षा केली नव्हती. पण का कुणास ठाऊक मला तीच अस रुक्ष वागण आवडलं नाही. खूप वेळ मी विचार केला. शेवटी मनाला समजवल तिने माझी काळजी घ्यावी इतक काही आमच नात दृढ नाही. पण खर सांगायचं तर मी तिचा फारच विचार करू लागलो होतो. त्यामुळेच नकळत तिने माझी काळजीने विचारपूस करावी अस मला वाटू लागलं.
दुसर्या दिवशी तिचा फोन आला कुठे आहात. आज जायचं डॉक्टरकडे जायचा ना ? मला पत्ता पाठवा मी येते. काय सांगू कळेना कारण मी डॉक्टरकडेच निघालो होतो. मी म्हणालो काही त्रास घेऊ नका जाईल मी . त्यावर थोड्या चिडक्या आवाजात म्हणाली पत्ता पाठवा. त्रास होईल का नाही हे मी पाहीन. मी पत्ता दिला त्यानुसार ती आली. मला वेळ लागणार होता म्हणून मी तिला जायचं असेल तर जा म्हणालो. तर मला काही हरकत नाही. तुम्हाला अडचण वाटत असेल तर जाते. अस बोलून मला तिने पुढे बोलूच दिल नाही. काय बोलू हिला. सरळ बोलतच नाही. थांबते म्हणाली तर काय बिघडणार का ? पण सरळ बोलयचच नसत. मी हसून थांबा म्हणालो. माझ आटोपलं त्यानंतर आम्ही जेवण केल. तिला सोडून मी निघून गेलो खरा, पण आता ती मला मैत्रिणीपेक्षा खूप काही वाटू लागली.
माझ्यासाठी ती हॉस्पिटलमध्ये आली होती. तस पाहता काय नात होत आमच मैत्री होती फक्त . पण ती ज्या काळजीने आली होती ती फार महत्त्वाची होती. खरच काय हव असत माणसाला. आपली कोणीतरी काळजी घ्यावी. आपल्यासाठी वेळ काढावा. प्रेमाने आपली चौकशी करावी हेच हव असत ना प्रत्येकाला. ह्या साऱ्या गोष्ठी माणूस घरात शोधत असतो. पण परस्पर हेवेदावे करताना आपल्या माणसाचे मन समजून घेण्याचे भान जोडीदाराला उरत नाही. म्हणूनच मैत्रीचा जन्म झाला असावा अस आज माझ ठाम मत झाल आहे. माझ्या काही मित्रांना मी सतत फोनवर बोलताना पाहतो. बायकोशी बोलत नाहीत हे कळत लगेच . काय तो उत्साह असतो बोलताना. मला पूर्वी ह्या अश्या बोलण्याचा, मैत्रीचा मनापासून राग यायचा. पण आता मला समजले खरच काही गोष्टी आपण आपल्या जोडीदाराला नाही सांगू शकत. त्याच गोष्टी मनमोकळेपणाने मैत्रिणीकडे बोलू शकतो. बायको संसाराचा आत्मा असेल पण मैत्रीण हि उत्साहाने जगायला लावणारी संजीवनी आहे हे म्हणायला हरकत नाही. अर्थात हे सर्व मनातच ठेवाव लागत.
ती ज्या काळजीने आली त्यामुळे ती मला आता पूर्वीपेक्षा खूपच आवडू लागली. सतत तिचा विचार यायचा. आजकाल फोनकडे पहायची सवय झाली. तीने कळत नकळत माझ आयुष्य व्यापायला सुरवात केली होती. पण आम्ही दोघेही आपआपली सामाजिक, कौटुंबिक जबाबदारी तितक्याच प्रामाणिकपणे सांभाळत होतो.
असाच एकदिवस फोनवर बोलत होतो तिच्याशी. सहज म्हणालो तुमचा भास झाला मला. किती छान वाटत होतात. केस मोकळे सोडले कि छान दिसत असणार तुम्ही . माझा थोडा थट्टेचा मूड होता. तीही तितक्याच मूड मध्ये होती. आमच अस बोलण चालू असताना मी तिला सांगितलं तुमचा क्षणाचा स्पर्श अजूनही आठवतो. तो हात सदैव हातात राहावा अस वाटत. शब्दापेक्षा स्पर्श बोलके असतात. तुमचा चेहरा हातात घ्यावा , मोकळ्या केसातून अलगद माझा हात फिरावा. अगदी मिठीत घ्यावस वाटतय . काहीही न बोलता तिने बोलण थांबवलं . कसलाही प्रतिसाद न देता फोन बंद करून निघून गेली.
ती निघून गेली खरी पण मला मात्र विचारांच्या वावटळीत सोडून गेली. का अस वागली ती ? नाही आवडल बोलण तर सांगायचं होत ना? पण असा अबोला काय कामाचा. इकडे माझा जीव जायची वेळ आली आहे आणि हि मात्र सरळ काहीही न बोलता निघून गेली. असंख्य विचार केले त्यादिवशी. अक्षरशः डोकं फुटायची वेळ आली. चेष्ठा केली तर इतका राग धरला तिने. करू का पुन्हा फोन. पण ती बोलेल का ? पण पुन्हा ठरवल जोपर्यंत तिचा फोन येत नाही तोपर्यंत मी सुद्धा बोलणार नाही. कळत नाही का तिला चेष्ठा केलेली. काय हे असलं वागण समोरच्या माणसाचा काही विचार करायचा नाही. नाही आवडलं तर सांगायचं . पण हे मी मला समजवत होतो का तर तिला फोन करू शकत नव्हतो . आणि माझच मन हो का ? अस आहे का हे प्रश्न विचारत होत.
ती न बोलता गेली त्यावेळेपासून मी अस्वथ होतो. कितीतरी वेळा मेसेज पाहिला. पण नाही, हट्टी आहे खूप बोलणारच नाही. दुपार पासून झोपेपर्यंत जे काही सोसलं ते मी व्यक्तच करू शकत नाही. उलघाल चालली होती माझी. का बोललो असहि वाटल खूप वेळा. पण काय करू मनात आल ते सांगितलं. शिवाय तिला खर बोललेलं आवडत मग का अशी फुगून बसली. बोल ना ग . नको रुसू नाही बोलणार पुनः अस . तुला नाही आवडत तर नाही वागणार. पण तू बोल मला अस अर्ध्यावर सोडून खरच जाऊ नकोस. मला तुझी साथ हवी . प्लीज नको ना दूर जाऊ. तिला हे सर्व सांगावस वाटत होत. पण फोन करता येत नव्हता. तिचा मूड कसा आहे. किंबहुना ती बोलेल कि नाही याची खात्री नाही.
काय विचार करत असेल माझ्याबाबतीत . सगळे पुरुष सारखे . काय समजले मी ह्या माणसाला . पण हा तर फारच नालायक निघाला. सगळे सारखे. असच वाटत असेल तिला. कस समजावू तिला मला तू सदैव हवी आहेस निदान मैत्रीण म्हणून तरी. खरच मला तुझ शारीरिक आकर्षण नाही. तुझं मनमोकळ वागण मला आवडत. पण तू अशी रागवून निघून गेलीस. मला ठाऊक आहे तू परत येणार नाही. किती मोठी चूक केली मी. का बोललो अस.
संपूर्ण रात्र तिच्या विचाराने तळमळत काढली. झोप तर यायचं नावसुद्धा घेईना . सकाळी नेहमीपेक्षा लवकरच ऑफिस गाठले. मन मात्र कामात लागेना. " खूप होतंय आता. पुरे झाल रुसण. नाही आवडलं तर सांग ना हक्क आहेच ना तुझा पण अशी काहीही न बोलता निघून जाऊ नकोस. बोल काहीतरी बोल. तुझा प्रत्येक निर्णय मला मान्य आहे. पण अबोला सोड ." हे मी फक्त मनात बोलू शकत होतो. कारण तिने मला पूर्ण दुर्लक्षित केल होत. क्षणभर मनात म्हणालो नाही बोलायचं तर नको बोलूस , निघून जा माझ्या आयुष्यातून मलाही तुझी काहीच गरज नाही. तुला फार attitude आहे. तशीच वाग. नको बोलूस. पण क्षणक्षणाला माझी अवस्था अधिकच कासावीस होत होती. पुन्हा वाटत होत देवा एकदा तीने फोन करुदे . मला खूप बोलायचे आहे.
दुपारी सर्वजण जेवण करायला निघाले. मला कसलीच इच्छा नव्हती. खरतर मी कालपासून जेवण केले नव्हते. माझ लक्ष फक्त फोनकडे लागल होत. आयुष्य अंधारल्या सारख वाटत होत. कितीही नाही म्हणालो तरी तिचा चेहरा मला स्वस्थ बसू देत नव्हता. तीच हसण आठवून त्रस्त होत होतो. कितीतरी वेळ मी एकटाच टेबलवर डोकं टेकून बसलो होतो.
अचानक फोनकडे लक्ष गेल तर " काल पासून मी खूप विचार केला, खर तर बोलणार नव्हते, पण कोणी न बोलता गेल कि खूप त्रास होतो याची मलाही जाणीव आहे. आपली मैत्री पुढे जाऊ शकत नाही अस मला वाटत आहे. तुम्ही जे काही सांगितलं त्यात तुमचा दोष नाही. मी स्वतःला जबाबदार समजते. खरच आपली मैत्री होऊ शकत नाही. मला माफ करा" असा तिचा मेसेज आला. मी तिला सांगितलं मला पूर्ण बोलायचं आहे. प्लीज न बोलता जाऊ नका.
बोला जे वाटेल ते बोला कारण या पुढे मी बोलू शकणार नाही माझी पात्रता नाही तुमची मैत्रीण होण्याची. ह्या तिच्या वाक्यावर इतका राग आला मला. " मग नाहीच बोलायचे तर का मेसेज केला. तुम्ही बायका पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करता, पुढे जायचं असत पण साध काही बोललं तरी झाल सत्यानाश . लगेच समोरच्या व्यक्तीला नालायक ठरवून रिकाम्या होता. तुम्हाला फक्त मदत म्हणून पुरुषांची मैत्री आवडते. नाही तर वाऱ्याला उभ्या राहणार नाही." असा जळजळीत मेसेज केला तिला. बापरे आत्तापर्यंत केवळ तिच्या फोनची वाट पाहत होतो आणि आता ती बोलत आहे तर माझ काय भलतच . काय बोलतोय मी. सगळा राग उफाळून आला. " काल पासून माणूस जिवंत आहे कि मेला हे सुद्धा पहावस वाटल नाही का ? कसली हि मैत्री मला तुमच्या मैत्रीची बिलकुल गरज नाही. नका बोलू. मी खूप चीड चीड करून बोलत होतो. एवढ्या वयात मला आत्ता कळल मैत्रीत नियम असतात."
तिने मात्र सर्व शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाली असली मैत्री मला मान्य नाही. शिवाय आज तुमचे वय समजले तेव्हा मला एकेरी हाक द्यायला हरकत नाही. कारण मी लहान आहे तुमच्यापेक्षा. तीच बोलण ऐकून मला थोडा हुरूप आला. तीच काहीच न ऐकता ती कशी सोडून गेली . हेच तिला सतत ऐकवत राहिलो. भास अस्तीत्व होऊ शकतात हे पण सांगितल. तुम्हाला अशी मैत्री मान्य असेल तरच मैत्री करा नाहीतर मला तुमच्या मैत्रीची गरज नाही. अस तिची परीक्षा करण्यासाठी बोललो . कारण मलाही शारीरिक जवळीक नको होती. पण तिला माझी ओढ कोणत्या कारणाने आहे हे जाणायची हि वेळ होती. माझ्या बोलण्यावर मात्र चिडली . खूप चिडली आणि म्हणाली स्पर्शामध्ये एवढी ताकत असती तर नवऱ्याला मैत्रिणीची आणि बायकोला मित्राची कधीच गरज भासली नसती. तीच बोलण मलाही पटत होत पण माझ मन काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत. नंतर तर मी स्वतः बोलण थांबवलं. तिने नियमाप्रमाणे फोन केला. " मी सोडून गेले नाही. पण मनातून खूप घाबरले होते. मला काहीही सुचत नव्हत. काही सुचत नसताना चर्चा करणे योग्य नाही म्हणून मी शांत होते. तुमच्या सारखीच माझ्याही मनाची तळमळ होत होती. नाही ती अट का असावी . मी मान्य करते मी न बोलता जायला नव्हत पाहिजे पण खरच खूप घाबरले होते. अस काही घडेल याचा विचारही कधी केला नाही. " आता तुम्ही ठरवा बोलायचे कि नाही. झाल फोन बंद करून गेली. हे आमच पहिल आणि आतापर्यंतच शेवटच भांडण. दोन दिवसात सर्व सुरळीत चालू झाल पण तू ( हो तिच्या परवानगीने तुम्हीची तू झाली ती. ) माझा विचार न करता मला सोडून गेलीस हे मी कधीच विसरणार नाही. अस म्हणालो कि ती जीवाचा आटापिटा करून मला समजवण्याचा प्रयत्न करते कि सोडून गेले नव्हते. विचार करत होते.
आज पुन्हा खूप वेळा मी आरशात पाहिलं स्वतःला . स्वतःवरच हसू आल मला. काय हे किती स्वप्नाळू झालो मी. तसे पाहता मी कल्पनेत जगणारा आहे. निराश राहण मला स्वतःला आवडत नाही. आणि निराश राहणाऱ्या लोकांपासून मी थोडा दूरच राहतो. पण आज माझ्यातला मी कुठे निघून गेलो की काय असच वाटत आहे. कारण ? हो आहेच तस कारण. आज उठल्यापासून माझा मूड काही वेगळाच झाला आहे. एक वेगळाच सुगंध सर्वत्र भरू पाहत आहे. त्यामुळे राहून राहून मला अगदी उत्साहित झाल्यासारखे भासत आहे. आज माझ मलाच हसू येत आहे. कोण म्हणत स्त्रियाच लाजतात. पुरुष सुद्धा लाजताततच की.
आजची सकाळ अगदी नेहमी सारखीच आहे. पण मला मात्र चारो ओर हरयाली छाई वगैरे असा काहीस वाटतय. रोज पक्षांची किलबिल ऐकून चीड चीड होते, का तर झोप मोड होते. पण आज त्यांची किलबिल खूपच गोड वाटत आहे. त्यांच्या किलबिलीने चिडणारा मी आज त्यांच्या प्रत्येक हालचाली पाहत आहे. किती सुंदर दिसतात ह्या चिमण्या. त्यांचा राखाडी रंग. पंखांच्या गर्द कडा . हलकीशी चाहूल लागली तरी भुरकन उडून जाणार्या. आणि पुन्हा तिथेच येऊन बसणाऱ्या.
काही दिवसांपासून मलाही अगदी त्या चिमणी सारखच वाटू लागलं आहे. कुठेतरी मी स्वप्नात रमत चाललो आहे. किती विचार करतो. त्यातंद्रित कोणी आल कि आलेला विचार बाजूला सारून त्यांच्यामध्ये सामील होतो. पण पुन्हा पूर्वपदावर येतो . रखरखत्या उन्हांत अचानक पावसाच्या सरी याव्यात आपली धांदल उडावी आत्ताच येण गरजेच होत का हा प्रश्न पडावा . पण तरीही ती प्रत्येक सर सुखावणारी वाटावी . तीच अवेळी येण खरच गरजेच होत हे नंतर मनाला पटाव . तसच झाल आहे माझ.
आज ती मला भेटायला येणार आहे. खर तर मी स्वतः जाणार होतो पण मला शक्य होत नाही हे तिने जाणून घेतलं म्हणूनच स्वतःच म्हणाली मी येते तुम्हाला भेटायला. तिचा एक स्वभाव गुण म्हणजे भेटायला येते अस ती कधीच सरळ बोलणार नाही. नेहमी तिरकस बोलणार. " काय करणार मला कुठे काम असत, तुम्ही मात्र फार काम करता मी काय रिकामटेकडी म्हणून येईल भेटायला. नाहीतरी तुम्हाला कुठे वाटती भेटायची गरज. तुम्हाला फक्त काम दिल तरी पुष्कळ आहे. करा कामच करा . गरज मला आहे तुमची तेव्हा मीच येईल भेटायला. " अस बोलते आणि सरळ फोन बंद करते. मला सुरवातीला वाटायचं काय हि अस काय बोलते. पण आता सवय झाली. फोन बंद करणार आणि नंतर पुन्हा मेसेज करणार राग आला का ? मी सहज बोलले. मी रागवले नाही . तिचा असा मेसेज आला कि मी तिला फोन करतो मग मी काहीही न बोलता फक्त हसतो . तर मग तीच नेहमीच वाक्य " काय झाल हसू येतंय का माझ्यावर" ?
सवय झाली तिची बडबड ऐकायची. मलाही जाणवत मला भेटण्यासाठी ती खूप अतुर असते. चिडते म्हणण्यापेक्षा तिची चीड चीड होते. पण कितीही चीड चीड झाली तरीही तिचं माझ्या प्रत्येक शब्दावर लक्ष्य असत. मी जास्त बोलत नाही अस जाणवलं कि राग आला का हे हमखास विचारते . किती शाईनिंग करणार. फार खडूस आहात. अस नेहमी बोलते. किती विचार करते माझा. आमची पहिली भेट आठवली कि अजूनही विश्वास बसत नाही कि आम्ही इतके जवळ आहोत.
खूप प्रेम करते ती माझ्यावर . माझी सतत काळजी वाटते तिला . कधीकधी तर सहज मला प्रश्न करते मला सोडून तर जाणार नाही ना ? मी सतत कामात असतो म्हणून तिला चिडचिड होते. मग स्वतःच सांगते मला भेटायचं आहे. पण तुम्हाला काम , तुम्हाला माझी गरज नाहीच हे तुम्ही सुरवातीलाच सांगितलं आहे. त्यावर मी फक्त हसतो मग तीच नेहमीच वाक्य " काय झाल हसू येतंय का माझ्यावर" ?
आम्ही शारीरिक आकर्षण म्हणून जवळ नाही तर मनाने जवळ आहोत अगदी हृदयात. आता तिची चेष्ठा करताना माझ्या मनावर कसलाच ताण नसतो. आणि तिला राग येत नाही हि सर्वात मोठी गोष्ट . खर सांगायचं तर सवय झाली तिची मला आणि माझी तिला.
मी चिडलो अस वाटल कि पटकन लव यु हा मेसेज पाठवते . तुमच्या मिठीत रहायचं आहे मला . आहे ना वेळ. काय सांगू तिच्या या वाक्याने मी खुदकन हसतो. मला हसताना पहायला आणि हसवायला तिला फार आवडत. हे सगळ घडलं ते हि नकळत....

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ठीक आहे. आधी मला वाटलं मिडलाईफक्राइसेसवाला इसम तरुणीच्या प्रेमात पडला आहे कि काय...