--दुनिया कधी हो येथे होती मधाळलेली--

Submitted by Nilesh Patil on 16 December, 2018 - 02:26

--दुनिया कधी हो येथे होती मधाळलेली--

दुनिया कधी हो येथे होती मधाळलेली,
शुद्ध शुभ्र तर कधी होती दुधाळलेली..।
कुठे गेल्या पापण्या साऱ्यांना रडवणाऱ्या,
गेली कुठे हो पिढी होती सुधारलेली..।

ध्यानी येत नाही आताचे हो माणूसपण,
शोधूनही सापडत नाही दुनिया अंधारलेली..।
हातही हरवले ते हो वेळेस साथ देणारे,
पिढी बरबाद झाली,जी होती उधारलेली.।

उगाच नका दाखवू मंतरलेली दुनियादारी,
सत्ता लबाड कोल्ह्यांचीच सध्या वधारलेली..।
बस्स करा हो आता हा खोटा-खोटा दिखावा,
प्रजा केली हो आता यांनीच नादारलेली..।

ठेच लागूंनी पुढल्याला मागचा होतो शहाणा,
कुणा उसंत येथे बघण्या जखम रक्ताळलेली..।
उरले लोक आता फक्त कडवट बोलणारे,
दुनिया कधी हो येथे होती मधाळलेली..।

--निलेश पाटील,--
--पारोळा,जि-जळगाव--
--मो-९५०३३७४८३३--

Group content visibility: 
Use group defaults