दिसे अंगा भरजरी-लावणी

Submitted by शिवाजी उमाजी on 11 December, 2018 - 12:38

दिसे अंगा भरजरी-लावणी

दिसे अंगा भरजरी, साडी तलम नऊवारी
नेसता नवथर नारी, पाहता उठे शिरशिरी।।धृ।।

काया तीची कोवळी, जशी शेंग हो चवळी
सोन्या वानी पिवळी, जणू चपळ मासोळी
उजळं रूप ते भारी, अंगी चोळी जरतारी
माळून गजरा मोगरी, वाटे इंद्राची ती परी

दिसे अंगा भरजरी, साडी तलम नऊवारी
नेसता नवथर नारी, पाहता उठे शिरशिरी।।१।।

प्याले नयन शराबी, गालावर रंग गुलाबी
आतुर ओठ जबाबी, पिऊन रस डाळींबी 
गळा मोत्याची सरी, नी साज कोल्हापूरी
सजली नटून बावरी, करून शृंगार भारी

दिसे अंगा भरजरी, साडी तलम नऊवारी
नेसता नवथर नारी, पाहता उठे शिरशिरी।।२।।
©शिवाजी सांगळे
मो.९५४५९७६५८९

Group content visibility: 
Use group defaults

अरे व्वा... मस्त.
झक्कास लावणी.
कविता, गझल, ललित, बालगीते आणि आता लावणी..
एकदम बहुपेडी साहित्यिक व्यक्तिमत्त्व आहे तुमचे.
तुमची प्रतिभा मायबोलीवर अशीच फुलत राहू दे.