काळजाच्या जमिनीवरती

Submitted by मुक्तविहारी on 9 December, 2018 - 13:45

काळजाच्या जमिनीवरती

काळजाच्या जमिनीवरती
उगवून यावे हिरवे झाड
या देहाची पोषक माती ही
माणुसकीची व्हावी वाढ

हजार जखमा उरात व्हाव्या
मिसळून जावे प्राणात प्राण
जगणे म्हणजे वेदनांचे घर
जगताना जगावे ठेवून भान

- मुक्तविहारी
परळी वैजनाथ

Group content visibility: 
Use group defaults