श्रावण सजला

Submitted by शिवाजी उमाजी on 9 December, 2018 - 12:46

श्रावण सजला

खूप सुंदर श्रावण सजला
कवितेमधे अलगद मुरला

ओलसर त्या पहाट वेळी
प्राजक्तही मनी लाजला

सावरताच धवल सर्वांगा
केशरासह तो लडखडला

केवड्याने कात सोडता
काट्यांसही दरवळ फुटला

मोगरा निपचित या प्रहरी
मिटूनी कळी शांत निजला

भिजून येता दवात शब्द
पानांवर सुगंध सांडला

रानांत बहर फुलांत बहर
बहर मना मनात बहरला

व्रतवैकल्ये मनी ठसवुनी
श्रावण हा पुन्हा प्रकटला

खूप सुंदर श्रावण सजला
कवितेमधे अलगद मुरला

© शिवाजी सांगळे
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t31229/new/#new

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

व्वाह पाटीलजी,
तसा श्रावण सजून निघून गेला, ज्यांना तेव्हा नाही लक्षात आला, त्यांच्या साठी आता सांगितला.

कविता आणि अभिप्राय दोन्हीही छानच.
श्रावण महिना नसला म्हणून काय झाले कवितेत श्रावण परतवून आणण्याची ताकद असते.