Submitted by अनन्त्_यात्री on 9 December, 2018 - 03:35
अज्ञाताच्या देशातून कुणी अनाहूत येतो
जड चेतनाच्या सीमा पार पुसून टाकतो
झिरझिर धुक्यातून क्षणमात्र डोकावतो
रस रंग नाद गंध सरमिसळ करतो
विझूविझू रोमरोमी ज्योती पेटवू बघतो
लेखणीच्या टोकापाशी हटवादून बसतो
आत ओथंबून येता सरसर बरसतो
अज्ञाताच्या देशातून
शब्द अनघड येतो
भवताल कोंदुनिया
दहा अंगुळे उरतो...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
लिखाणाची प्रक्रियाच अशी आहे..
लिखाणाची प्रक्रियाच अशी आहे... आतून स्फुरते... लिहूनही उरते. खूप सुंदर।
वाह, सुरेखच...
वाह, सुरेखच...
निःशब्दी शब्द उमटता साकार झळाळत येते
व्यक्ताच्या वाटेवरती शब्द फूल वळुनी बघते....
शिवाजी, शशांकजी धन्यवाद!
शिवाजी, शशांकजी धन्यवाद!