किमयागार

Submitted by Asu on 7 December, 2018 - 21:56

किमयागार

अजब तुझे डोळे गड्या
अफाट तुझी स्मृती
प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर
दिसे हुबेहूब कृती

रेटिन्यावर तुझ्या लिंपिले
सिल्व्हर हलाईडस् थेट
निगेटिव्ह पॉझिटिव्ह करण्या
धडपडे अंधारी थायोसल्फेट

डिजिटल तू आज जाहला
अद्भुत अचंबित खूप
सेंसोर चिपेवर पिक्सेल
साठवी तेजस्वी रंग रूप

बटण दाबता होतो मानव
तुझ्यात कैद क्षणात
सुंदऱ्या वा असो बंदऱ्या
सदैव तुझ्या प्रेमात

उपकार तव कॅमेरेदादा
झाले आम्हावर भारी
तुझ्याविना कोण करील
आम्हां अमर या संसारी

सुख असो वा दुःख
तुला न त्याची क्षिती
स्थितप्रज्ञ तू महान हस्ती
तुला न कुणाची भीती

काळालाही गोठविशी तू
अफाट तुझी शक्ती
आठवणींना देशी उजाळा
किमयागार तू जगती

- प्रा. अरुण सु. पाटील (असु)
(दि. 07.12.2018)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults