दृष्टी

Submitted by स्वप्ना_राज on 7 December, 2018 - 11:52

‘तुला झोप येतेय. मला चालवू देत ना. कधीची सांगतेय'
‘अजिबात नाही. मी आरामात चालवू शकतो. तू चालवायला लागलीस तर सकाळ होईल पोचेपर्यंत'
‘काहीही काय? मी एव्हढी स्लो पण नाही चालवत हं'
‘Yeah right'
‘संदीप! ऐक ना. समोर ती चहाची टपरी दिसतेय तिथे निदान चहा तरी घेऊ यात'.
‘कुठली टपरी?’
‘ही काय समोर दिसतेय'
‘बरी आहेस ना? मला टपरी-बिपरी काही दिसत नाहीये'
‘अरे असं काय करतोयस? मला तर समोर.....संदीप! उगाच खेचू नकोस हं'
‘हीहीही. कसली टरकली ग तुझी. ती समोरची टपरी? नको बाबा. कसले कळकट कप आहेत बघ. आणि तो टपरी चालवणारा त्रेतायुगातला दिसतोय. घरी पोचल्यावर आत्तेला मस्त आलं घालून चहा करायला सांगू. चल आता उशीर होतोय.’
----
‘काका....चाय जाली का तय्यार?.........च्या मारी.........आं.....हे काय आक्रीत म्हनायचं वो काका?’
‘धा दिसांपूर्वी तो गाडीचा आक्सीडेन्ट जाला नव्हता का पुढं वडगावाजवळ? तवाधरनं रोज सांच्याला हेच चाललंया बग.....गाडीचा आवाज येतूया....आक्षी दोन मिंटं माज्या टपरीम्होरं उबी हाय असं वाटतंया...... मग दूर जायचा आवाजबी येतूया.... पर दिसत न्हाई पोरा.... कायबी दिसत न्हाई.’

----- समाप्त -----

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Wow!!

छान मेसेज -
मेसेज इग्नोर करू नका - झोप येत असेल तर गाडी साईडला घ्या किंवा पार्टनर ला सांगा ड्राईव्ह करायला.

आवडली.

> मेसेज इग्नोर करू नका - झोप येत असेल तर गाडी साईडला घ्या किंवा पार्टनर ला सांगा ड्राईव्ह करायला. > +१

सर्वांचे मनापासून आभार Happy च्रप्स, अ‍ॅमी....संदेश वगैरे द्यायचा काही हेतू नव्हता हो. पण तो तसा जात असेल तर बरंच आहे. Happy

शेवटच्या क्षणा पर्यंत आपली जाणीव आपल्यास कशी धरून ठेवते याचे हे उदाहरण आहे. छान. अजून लिहा.

छान आहे कथा.
मी थोडक्यात बचवलो. रात्रीचे दोन वाजता एका चौकात लक्षात आलं की आपण जस्ट एक दोन सेकंदा करता डुलकी घेतलीय. एकदम सावध झालो डोळे ताणून उघडले, मान झटकली. घर दोन किलोमीटर फक्त, अजिबात डुलकी लागू द्यायची नाही आता, पाच मिनिटात घरी पोहोचु.

आणि तिथून दोनशे मीटर वरच रस्ता वळत होता, गाडी डिव्हायडरला ठोकली आणि दुसऱ्या डुलकीतून जाग आली स्टीअरिंगवर डोके आपटून. सुदैवाने मागील डुलकी पासून स्पीड खुप कमी केला होता, म्हणून गाडीने पलटी मारली नाही. गाडीचे बरेच नुकसान झाले, इंजिन डॅमेज. अंगाला एक दोन ओरखडे.

भारी... मस्त जमलिये,,,,,,,,,,,दाद,>>>>????????कित्ती दिवसांनी परत आलात
प्लिज लिहित्या व्हा न पुन्हा

दाद,>>>>????????कित्ती दिवसांनी परत आलात
प्लिज लिहित्या व्हा न पुन्हा
>>>> + १

दाद,
कित्ती दिवसांनी परत आलात
प्लिज लिहित्या व्हा न पुन्हा>>>> +१११११११११११११११