आठवणींच्या वाटा

Submitted by राजेंद्र देवी on 4 December, 2018 - 21:29

आठवणींच्या वाटा

शिशिराची शिरशीरी
भिने रोमारोमात
आवळून घेतसे
शाल ती जोमात

थंडी गुलाबी झाले हाल
अपरे नाक झाले लाल
कोवळ्या सूर्य प्रकाशात
गाली उधळे गुलाल

विस्कटलेले केस अन
झिरमिळत्या बटा
सावरण्याचा प्रयास
पडे तिचा थिटा

घ्यावा वाफाळता चहा
की घुसावे पुन्हा रजईत
काय करावे सुचेना

तुडवाव्या का पुन्हा
आठवणींच्या वाटा
आठवणींच्या गुलाबाला
गुलाबी काटा

राजेंद्र देवी

Group content visibility: 
Public - accessible to all site users