गाज

Submitted by शिवाजी उमाजी on 2 December, 2018 - 21:38

गाज

विझू लागला भानु, अंधारली सांज
पांगल्या सावल्या, घेत चांदण साज

ओहोटी सागरा, ठसे वाळूवरी मागे
घुमू लागली कानी, निरोपाची गाज

वाहतो हळू पवन, सावळ्याची धून
कानाशी गुंजते, तीची सुमधुर गुज

कोमेजल्या कळ्या, ताटात राऊळी
निजली रानफुले, फांदी करुन शेज

उतरली पारावर, पानगळ झाडांची
विश्रांती घेतात, काही मातीत निज

© शिवाजी सांगळे
http://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t31412/new/#new

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अहाहा.. खासच.
तुमच्या शब्दांनी प्रसिद्ध कवी गोडघाटेंची आठवण करून दिली.

धन्यवाद...
मी नाममात्र आहे. कवी ग्रेस खरोखरच ग्रेट, त्यांच्या पायाजवळ पण आम्ही नाही.