मंजू २

Submitted by naidu suvarna p... on 30 November, 2018 - 03:02

असंख्य विचार मनात येत होते पण काय बोलावे व का बोलावे हे तीच तिलाच काळत नव्हत . आईच्या इच्छेनुसार लग्न पार पडल. बहिणीच्या तीन मुलांना जवळ करून क्षणापूर्वी एक अल्लड असणारी मुलगी आता तीन मुलांची आई झाली होती .
संसार बऱ्यापैकी चालू होता. पूर्वी ज्याला दाजी म्हणावं लागायचं तोच आता नवरा झाला होता. संवाद घडायचा तो फारच क्वचितच म्हणजे मुलीला अमुक हव आहे. मुलासाठी कपडे हवे असे. या सर्व गोष्टीत ती स्वतःला परिपूर्ण विसरली होती . आपल स्वतःच आयुष्य नेमक कस असाव हे तिला स्वतःलाही कळत नव्हत. स्वतःला पूर्ण झोकून दिल होत बहिणीच्या संसारात. पण तरीही सतत आई सांगायची मुल स्वतःची म्हणून सांभाळ.
खूप ओढाताण व्हायची तिची अचानक आलेल्या जबाबदारीमुळे. कधी कधी ती भांबावून जायची . पण मुलांकडे ती तितक्याच प्रेमाने पाहत होती. त्याचं सर्व करत होती. लग्नाला आता जवळपास २ वर्ष झाली होती. एकदिवस आई जवळ बसून म्हणाली तुला एक सांगायचं आहे. बाईची मुल तू आईसारखीच सांभाळत आहे. पण .....
तुला तुझीपण मुल असायला हवी. म्हातारपणी कोण पाहणार तुला. आईच्या ह्या वाक्याने ती चिडली कशासाठी मुल पाहिजे. या मुलांना सांभाळते मग हीच बघतील मला. खूप खूप मनस्ताप करून घेतला तिने पहिल्यांदा . आई मात्र तिला ह्या ना त्या मार्गाने समजावत होती. तिला मात्र एकच प्रश्न पडला होता. कि ज्या मुलांना सावत्रपण सोसायला लागू नये त्या मुलांसाठी मी कसलाच विरोध नकरता लग्न केले ती मुल मला म्हातारपणी सांभाळू शकणार नाही का ? मग जर हे असे होते तर माझ आयुष्य अस का दावावर लावल. खूप विचार करत होती ती. काहीही झाल तरीही मुल नकोच हा तिचा ठाम निर्णय होता. कारण जन्म दिला नसला तरीही ती मनापासून आई झाली होतीच.
आपली बायको कोणत्या विचाराने उदास आहे हे तिच्या नवऱ्याला सासू कडून समजल . त्याचही मत तेच ठरलं कि तुलाही तुझी मुलं हवी. मग मात्र तिने नवरा आणि आईवर तोंडसुख घेतलं. खूप निराश झाली होती ती ह्या दुट्टपी बोलण्याने. स्वतः कुढत होती. खरच मला माझ कोणीतरी हव का ? पण मी ज्या मुलांची आई झाले ते मला अंतर का देतील. सर्व आपलेपणाने करत असताना अचानक आपल काहीच नाही आपण केवळ निमित्त आहोत याची जाणीव व्हावी अस वाटल तिला. मग एक विचार तरळून गेला . मला माझ स्वतःच बाळ हव . जे केवळ माझ असेल. त्यावर केवळ माझा हक्क असेल. ज्याला मी , माझ मन , माझ्या भावना न सांगताही समजतील . एक ना अनेक विचार केले तिने.
.... तीच पहिलं बाळ या जगात आल. गोरपान, गुटगुटीत भरपूर बाळस होत त्या बाळाला. हो मंजूचा जन्म झाला होता. आई नेमकी कशी असते किंबहुना आपल्या मुलांसाठी आईची तगमग कशी होते याची प्रचीती आली तिला. मंजूच्या येण्याने खूप मोठा आधार मिळाला. कर्तव्य करत असताना आपलेपणाचा ओलावा तिला मनोमन सुखावत होता. आपल बाळ आता बोबड बोलू लागल याच तिला फार अप्रूप वाटू लागल. आई हा शब्द ऐकण्यासाठी ती आतुर झाली होती. मंजुवर खूप प्रेम होत तीच पण एक खंत मात्र सतत होती ती म्हणजे मंजु सुद्धा तिला मावशीच म्हणू लागली. आता ती दोन वर्षाची झाली. मंजू नंतर गणेशचा जन्म झाला. पण तरीही तिला ओढ वाटायची ती केवळ मंजूची.
मंजूच्या रुपात तिला भेटली होती स्वतःची खरी मैत्रीण. या माझ्याबाळला माझ्यासारखं काही सोसायला लागू नये हा होता तिचा एकमेव ध्यास. आत्तापर्यंत जबाबदारी म्हणून करावी लागणारी सर्व कामे ती खूपच आनंदाने करू लागली. ५ मुलांचं सांभाळ करत असताना आर्थिक बाजू सावरण कठीण होऊ लागल. मग यातून तिने मार्ग काढला . नवरा कामावर गेला कि ती पोळ्या लाटायचे काम करू लागली. कोणाच धान्य निवडून दे . कोणाची छोटी मोठी काम करू लागली. काळानुसार मुलं मोठी झाली. मोठ्या दोन मुलींची लग्ने झाली.
मंजू सतत तिच्या अवती भोवती असायची . आईला प्रत्येक कामात मदत करायची. आपण काम करतो हे वडीलांना कळू द्याच नाही हे आईने तिला सांगितलं होत. कारण काय तर त्यांना ते मान्य नव्हत म्हणून. मग झाल आईची ओढाताण कमी करायची जबाबदारी मंजूने घेतली. संध्याकाळी ती स्वतः पोळ्या लाटायला जाऊ लागली. आबा म्हणजे वडील घरी येण्याअगोदर ती माघारी यायची.
आबांना आपल्यापेक्षा आपल्या मोठ्या भावंडाच फार कौतुक असत . ते आपल्याशी मोकळेपणाने का बोलत नाही. याचा तिला प्रश्न पडायचा. तिची खूपच घालमेल व्हायची विचार करून. अस का ? हा एकच प्रश्न तिला सतत बोचत रहायचा. गणेश पेक्षा आबांना अरुण जास्त जवळचा वाटतो. हे तिने निरीक्षणातून जाणले होते. पण विचारणार कोणाला. सतत हेच दृश्य दिसायचं घरात. गणेश आणि मंजूला आबा नेहमी डावलायचे. हे आईलाही कळत होत. मोठ्या मुलांनी काही मागितलं कि लगेच मिळायचं. पण गणेश आणि मंजूला नेहमी वाट पहावी लागयची. न राहवून एक दिवस तीने आईला आबा असे का करतात हा प्रश्न विचारला ?
काय सांगाव या मुलांना हा प्रश्न आईला पडला. स्वताच्या जीवनाची कहाणी तिने मंजुला सांगितली. तीच मन हलक झाल. पण " आपला जन्म केवळ हिलाही स्वतःच मुल हव या भावनेतून झाला आहे." या विचाराने मंजू अस्वस्थ झाली. पण मंजूच्या येण्याने आईला कसा आधार वाटला. तिचे आयुष्य कसे बदलले हे ऐकून मंजू फारच भावूक झाली. आपण लहान असूनही आपला आधार आईला वाटतो या विचाराने ती भारावून गेली. आणि त्या क्षणापासून ती पूर्ण बदलून गेली. आपल्या आईला केवळ आपणच आहोत हे तिला कळून चुकले. त्या क्षणापासून आपल्या आईला सदैव हसत ठेवायचं , तिला कुठलंच दुख होऊ द्यायचं नाही हा ठाम निर्णय घेतला तिने. तेंव्हा पासून आजच्या क्षणापर्यंत मंजू केवळ आईसाठीच जगत राहिली.

आज मंजूची आई पुन्हा त्रस्त झाली . कोणत्या गोष्टीची शिक्षा म्हणून हे दिवस तिला पहावे लागत आहेत हेच तिला कळत नाही. मंजू तिची मंजू काय होईल तिचे हा एकच विचार तिला सतत त्रास देत आहे. आज मंजू नेहमीपेक्षा जास्तच सुंदर दिसत आहे. कोणताही भाव नाही चेहऱ्यावर . रखरखत्या उन्हात पाण्यासाठी जीव कासावीस व्हावा आणि थंडगार पाणी मनसोक्त प्यायला मिळाल्यावर चेहरा खुलून यावा तसाच चेहरा भासत होता तिचा.
(क्रमश:)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आता कळले मंजु च्या आई चे लग्न मंजुच्या मावशीच्या नवऱ्या बरोबर झाले... चांगली चाललेय.. पुढचा भाग लवकर येऊ दे