शब्द दर्जेदार झाला...

Submitted by माउ on 29 November, 2018 - 16:41

मी प्रियाला पाहिले अन..
काळजावर वार झाला...
घाव माझा झोपलेला
पेटला, अंगार झाला...

ते नाते वेडे होते..
कि वेडा पाऊस होता?
हलके हलके आला
जाताना, मुसळधार झाला...

किती गिरवले मी तुला
किती शब्द खर्चात गेले
जो कोरला मनावरी तू
तो शब्द दर्जेदार झाला...

ते गुंतले नाही तिथे
ना भान त्यांनी हरवले
दोन वेडे भेटले अन
एक वेडा ठार झाला...

जग सांगते आहे मला
मी माझीच नाही राहिले
काय सांगू तुला बघून
मीपणाचा भार झाला

तो जरा मिठीत ये म्हणाला
मी लाजले अन दूर गेले ..
सांगू कसे ओठांचा इकडे
वेगळासा विचार झाला

-रसिका

Group content visibility: 
Use group defaults

दोन वेडे भेटले अन
एक वेडा ठार झाला... एक वेडा होता तो ठार वेडा झाला, छान कल्पना। कविता आवडली .