--दिलासे--

Submitted by Nilesh Patil on 28 November, 2018 - 11:43

---दिलासे---

दिले मज साऱ्यांनी खोटे खोटे दिलासे,
म्हणे,वाटून घेऊ आम्ही,दुःख तुझे जरासे..।

देखावाच केला ह्या लोकांनी चांगुलपणाचा,
मुखवटेच होते सारे,कळून सुटले उसासे..।

जाऊ कुठे आता,दुःखात साथ शोधण्या,
सांगा कुणी जरा,करा कुणी खुलासे..।

वेड्या मनास माझ्या,मिळे कसा निखारा,
सुन्या माझ्या जीवाला,आधार द्या खरेसे..।

--निलेश पाटील,--
--पारोळा,जि-जळगाव--
--मो-९५०३३७४८३३--

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults