आरण्यक - हिरवाई (भाग – ०२ ब)

Submitted by अ'निरु'द्ध on 23 November, 2018 - 13:02

आरण्यक - हिरवाई (भाग – ०२ ब)
Aaranyak – Flora (Part -02 B)

[ आरण्यक - हिरवाई (भाग – ०२ अ) वरुन पुढे चालू… ]

आरण्यक मधील सखे सोबती आपण पहिले.
हे सखे सोबती ज्या हिरवाईमुळे जमले, वाढले, ती हिरवाई मात्र अतिशय कमी पाण्यामुळे फार कष्टाने विचारपूर्वक वाढवायला लागली आहे आहे. याचा तपशील कदाचित पुढे एखाद्या भागात येईलच.. . . . .
आता तर ह्या हिरवाईला फळं , फुलंही लागायला लागलीयेत.
जेव्हा जेव्हा तिथे मला जायची संधी मिळे तेव्हा आवड म्हणून या हिरवाईची प्रकाश चित्रे मी टिपत असे.
या हिरवाईची सध्याची आणि वेगवेगळ्या वेळी काढलेली प्रकाश चित्रे तुमच्यासाठी . .. . (भाग – ०२ ब)

प्रचि २८ : Jamaican spike plant.. या झाडावरती फुलपाखरांची अगदी झुंबड असते...

प्रचि २९ : कोरफडीचे फुल आणि त्यावरचा नाकतोडा…

प्रचि ३०: सागरगोट्याच्या वाळलेल्या शेंगा..
हे सागरगोटे आरण्यकच्या हद्दी वरती सजीव कुंपण म्हणून लागवड केलेले आहेत...

प्रचि ३१: गवताच्या जंगलात...

प्रचि ३२: आमचाही Fall Season (ब्राऊन पानगळ)

इथे थोडाफार भाजीपालाही पिकविला जातो

प्रचि ३३: वांग्याचे कोनफळी फुल..

प्रचि ३४: अननस ..

प्रचि ३५: बला चे फुल... (Sida Acuta) (मराठी नांव : चिकना)

प्रचि ३६: दुधी ...

प्रचि ३७: भाजीसाठी वाफे ..

प्रचि ३८: पालक

प्रचि ३९: कोथिंबीर...

प्रचि ४०: शेपू...

प्रचि ४१: वाईवरून आणलेली आणि रुजवलेली हळद ...

प्रचि ४२: केळी ...

प्रचि ४३: भाजी भाजी... Happy Happy Happy

प्रचि ४४: सीताफळ ..

प्रचि ४५: लिंब

सुरुवातीला काही फुलवेली आणि फुलझाडं लावली होती

प्रचि ४६: त्यापैकी हे कृष्णकमळ..

प्रचि ४७: पावडर पफ ....

प्रचि ४८: ECO -POND ...

प्रचि ४९: लिली -०१

प्रचि ५०: लिली-०२

प्रचि ५१: इको पाँड मधल्या पाणवनस्पतीचे फुल...

प्रचि ५२ :रामबाण कापूस...

प्रचि ५३: भोकर (ह्याच्या फळांपासून लोणचं बनवतात)

प्रचि ५४: आणि हि लाडकी चिंच...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वच प्रचि मस्त..
फॉलचा फोटो सुरेख..
भाजी भरपूरच निघाली हो निरु..
भोकरं आमच्याकडे पिकल्यावर नुसतीपन खातात..कडसर गोड चव असते.

वाह... हिरवाई! डोळे निवले हे पाहुन. सगळी झाडे अशी मनापासुन, झरझरुन वाढली आहेत असे वाटतेय. Happy

नँक्स, टीना, हर्पेन, वावे, मी_आर्या, सामी, किल्ली, सायु ...

प्रतिसादाबद्दल धन्यवाद....

@ वेडोबा : हो योग्य वेळी पाऊस पाणी झालं तर होते भाजी..

@ जागू-प्राजक्ता-... : ठेवतो काकडीच्या बिया..

मस्तच फोटो.

तो पानगळीचा फोटो खास आवडला. 'हीना' सारख्या टुकार सिनेमातले 'चिठीये' सारखे गाणे अशाच पानगळीमुळे लक्षात राहीलंय.

अहाहा ! काय डोळ्यांना सुख मिळालंय !
सागरगोट्याच्या झाडाला वाईट काटे असतात .. गुरे हि याचा पाला खात नसल्याने बऱ्याचदा कुंपण म्हणूनच लावतात ! नाहीतर मग पेरकुट आहेच कुंपण म्हणून ..
भोकरं आमच्याकडे पिकल्यावर नुसतीपन खातात..>>+११ येस्स मला पण जाम आवडतात
मस्त फोटोस निरुदा !

<<<तो पानगळीचा फोटो खास आवडला.>>>
@ माधव : हो. मलाही.
हिरवाई तर बरेच जणं टिपतात. आणि परदेशी फाॅलचं कौतुकही होत असतं...
इथेही ही पानगळ झाल्यावर जे दृष्य दिसत होत ते ही टिपण्यालायक होतं..
खर तर या भागात किरमीजी कांचनाची ३/४ झाडं आहेत...
त्याची तळहातापेक्षा मोठी पान गळून जमिनीवर पडली की जमीन छान आच्छादीत करतात. ह्या पानांचा रंगही जीर्ण पिवळा न होता छान ब्राऊन होतो.. आजूबाजूचे कदंब त्यात आपली भर घालतात.
आणि आसमंतात कुठेही दुष्काळी छटा न येता पुढच्या पोपटी हिरवाईची चाहूल देणारी, आश्वासित करणारी ही तपकिरी छटा पसरते..
हाच तो आरण्यकचा फाॅल..

>>> भोकरं आमच्याकडे पिकल्यावर नुसतीपन खातात..कडसर गोड चव असते. <<<
@ टीना
आणि
>>> भोकरं आमच्याकडे पिकल्यावर नुसतीपन खातात..>>+११ येस्स मला पण जाम आवडतात <<<
@ anjali_cool ,

ही भोकरं पिकल्यावर खाण्यात मजा असतेच पण ती दुसर्याला खायला लावण्यात जास्त मजा असते.
याला कारण पिकल्यावर आत तयार होणारा चिकट्ट गर.
दिसायला आणि स्पर्शाला असा की काही ठिकाणी याला शेंबूड फळही म्हणतात..
आणि त्यामुळे नवशिक्याचं तोंड चिकटून रहातं.

या फळाची एक आठवण अशी :
आरण्यक नवीन नवीन असताना एकदा लोणावळ्याला गेलो होतो.
तिथे जोशींची खानावळ आहे जी फासे नावाची फॅमिली चालवते. त्यांच्याकडे चिकन-भाकरी बरोबर एक लोणचं दिलं होतं. मला ते भयंकर आवडलं म्हणून परत मागितलं अर्थात हे विचारुन की मिळेल का थोडं अजून आणि कसलं लोणचं आहे.
तर वाढपी म्हणाला.. घ्या हो भरपूर, हे समोरच्या झाडाचंच आहे, भोकराचं..
तेव्हापासून दरवर्षी भोकरं लोणच्यासाठी घरी आणायला सुरुवात केली..
अर्थात पहिल्या वर्षीचा प्रयोग मुद्दलातच फेल गेला.. कारण मी पूर्ण पिकलेली फळं घरी नेली होती.. Happy
मग पुढच्या वर्षीपासून मात्र कच्च्या फळांवर लक्ष ठेवायला लागलो..

खूप सुरेख फोटो आहेत सगळे. भाजी अजून वाढवा, म्हणजे त्या निमित्ते मी ठाण्यात येईन Happy Happy

भोकराचे लोणचे फार उत्तम लागते. मी यंदा पहिल्यांदाच केले होते.

Sundar...

माधव, खाली लिंक दिलीय रेसिपीची.

https://www.maayboli.com/node/42775

पहिल्यांदा केले म्हणून पाव किलोचेच केले होते. गेल्या एप्रिलमध्ये क्रॉफर्ड मार्केट परिसरात उगीच फिरायला गेले होते, तिथून भोकरे व माईनमूळे आणून लोणचे घातले होते, वेगवेगळे.

यावर्षी आरण्यकमधून भोकरे आणेन. तशी माझ्या कॉलनीत
व टेकडीवर मिळून 4 सार्वजनिक झाडे आहेत भोकराची पण आरण्यक ते आरण्यक.

धन्यवाद, साधना.

खूप खटाटोप आहे. त्या बीया काढायला काही युक्ती ?

<<<यावर्षी आरण्यकमधून भोकरे आणेन. तशी माझ्या कॉलनीत व टेकडीवर मिळून 4 सार्वजनिक झाडे आहेत भोकराची पण आरण्यक ते आरण्यक.>>>

या आपलेपणा बद्दल मनापासून धन्यवाद... _/\_

Pages