पुन्हा घे मना तू उभारी जराशी

Submitted by द्वैत on 21 November, 2018 - 13:30

पुन्हा घे मना तू उभारी जराशी

पुन्हा घे मना तू उभारी जराशी
अजून बाकी आहेत स्वप्ने उराशी
जरी वादळे आली न थांबणारी
जरी रात्र भासे ही न संपणारी
तुझी आत्मशक्ती तुला साथ देईल
तुझी दृढ इच्छा तुला पार नेईल
तुला निश्चयाने नवे मार्ग मिळतील
तुला संयमाने नवे भेद कळतील
तुला खेद नाही तुला हर्ष नाही
खुळ्या भावनांचा तुला स्पर्श नाही
असे एकमार्गी हा तुझा प्रवास
तुझा तूच स्वामी तुझा तूच दास
कळू दे जगाला तुझीही मिजाशी
अजून बाकी आहेत स्वप्ने उराशी

- द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users