पोरकेपण !!

Submitted by मण - मानसी on 21 November, 2018 - 06:52

आज पुन्हा ती तिथेच उभी,
त्याच मावळणाऱ्या सूर्याला पाहत,
कदाचित पुन्हा नवीन गार्हाणे मांडत,
पुन्हा त्याला तिच्या व्यथा नव्याने सांगत,
पुन्हा कोणाची तरी करुण कहाणी मांडत,
आज पुन्हा ती तिथेच उभी,
मावळणाऱ्या सूर्याला पाहत!!१!!

तशी तर रोज,
उध्वस्त झालेल्या मुलींना आधार ती देत,
त्यांना उभारी देण्यासाठी,
रोज़च करे मेहनत,
रोज रोज त्याच कहाण्या,
रोज होती पाहत,
रोज हजारो कळ्या,
तिच्याचपाशी धुमसत,
नानाविध अत्याचारातून,
तीच त्यांना बाहेर काढत,
त्यांना पुन्हा जगण्यास,
तीच देतसे हिंमत,
जरी रोज अश्रू दाटून येई,
तरीही कधीही न रडे, फक्त त्या सूर्याला मात्र असे सगळं सांगत !!२!!

आजही अशीच जखडली होती,
त्याच निर्जीव कळ्यांना उमलवण्यात,
काळाने घातली झडप,
तिच्याच चिमुकलीचा केला घात,
एव्हडीशी ती पोर,
आकांताने होती विव्हळत,
त्या नराधमाला ,
तिचे वयही नव्हते कळत?
स्वतःच्या भावावरचा विश्वासच,
फोल ठरला होता,
चिमुकलीच्या मामानेच तिचा,
जीव घेतला होता,
चिमुकल्या जिवाबरोबर,
प्राण तिने हि सोडला,
त्याच सूर्याला कहाणी सांगत,
जीव आज तिचा गेला,
जीव तिचा एकटीचा गेला,
पण त्या सगळ्याच कळ्या आज आहेत पोरकेपणात नाहत,
सगळ्याच कळ्या आज आहेत पोरकेपणात नाहत!!३!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults