ओयासीस

Submitted by Santosh Daunde on 21 November, 2018 - 00:23

वाळवण वाट्याला आले म्हणून
सुकू नये मरुस्थलांनी
डोक्यावरती सूर्य झेलत
खुशाल जपावा एखादा ओयासीस
साठवून ठेवावी एखादी हिरवळ
मनाजोगती
तप्त वाळुतही असतात पाणवठे
डोंगर ओलांडून
फुटतो अवकाळी ढग
तेव्हा उष्ण हवेतही पसरतो गारवा
इवल्याशा ढगफुटीने
डवरतात खुरटी झाडे
रेगिस्थानाचाही ध्रुव होतो कधी
आणि शहारून जातात क्षणक्षण

— संतोष दौंडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users