खोपडी बारस (तुलसी विवाह)

Submitted by Asu on 20 November, 2018 - 00:08

खोपडी बारस हा प्रामुख्याने खान्देशातील शेतकरी बांधवांचा सण आहे. या दिवशी तुलसी विवाह झाल्यावर लहान मुलाला श्रीकृष्ण म्हणून खोपडीत बसवून त्याला शेतमालाचे भाव विचारण्याची प्रथा खान्देशातील शेतकऱ्यांनी पाळलेली दिसते. त्यानंतर लग्नसराई सुरू होते.

*खोपडी बारस (तुलसी विवाह)*

आज कार्तिक द्वादशी म्हनती खोपडी बारस
गेरू चुन्याची रांगोयी भवती दियायची आरास

लगीन तुयसाचं करू धांडे उसाचे अानिसन
मांडव खोपडी उभारू मंधी चौरंग मांडीसन

बोरं सिताफय आवळा मंधी किस्न सावळा
करू माह्या बाईचा आज भारी लगीन सोहळा

हायद तेलानं त्याह्यची मंगल आंघोय करा
तुयसा बाईले माह्या लाल कापड पांघरा

कन्यादान सुखे करू येळ राही आता थोडा
ताट वाट्या वाजवा रं आनं फटाकं बी फोडा

लगीन तुयशीच व्हता सुरू झाली लगीन सराई
पोरं पोरी मोठी झाली आता करा लगीन घाई

कोन्ही छकुला मंग सजल्या खोपडी बसावा
धन धान्याचा भाव त्याले दुध दिसन पुसावा

खुस भोया शेतकरी फकस्त आयकिसन भाव
कोनी फुकट ईचारिना झालं वसाड रान, गाव

आता सरली दिवायी गेली खुशीबी नीवायी
शेतामंदी घाम गेला नही दीडदमडी कमाई

डोयांमंधी पानी खारं आन गाली चेहरा हासरा
आता सोधी शेतकरी जपल्या देवात आसरा

आसा सन आवंदा तुयशी विवाह साजरा
वाट पहातो शेतकरी पुढल्या वर्साले नजरा

- प्रा. अरुण सु. पाटील (असु)
(दि.20.11.2018)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults

छान !

राजेंद्र देवी सर,
ही कविता अहिराणी बोलीतील नसून लेवा गणबोलीतील आहे. आदरणीय बहिणाबाई चौधरी यांच्या कविता याच लेवा गणबोलीतील आहेत.