पौर्णिमा सौंदर्याची

Submitted by Asu on 19 November, 2018 - 07:03

पौर्णिमा सौंदर्याची

कलेकलेने चंद्र वाढतो, तव काया तशी फुलली
सोळावं वरीस लागता, पौर्णिमाच देही खुलली

जपून-जरा, सांभाळ-शील तू, सौंदर्याचा भार कसा
भल्याभल्यांना पिसे लावितो, पौर्णिमेचा माहोल असा

राहू-केतू टपून बसले, सौंदर्य तुझे डागाळण्या
लावतील ते ग्रहण तुजला, कठीण रूप सांभाळण्या

चंद्रालाही डाग असतो, पौर्णिमेचे तुला सांगणे
शाप की वरदान म्हणावे, सौंदर्य तुझे असे देखणे

पूनव चांदणे जगात पसरो, सौंदर्याची तू तर खणी
दुःख निराशा गिळून मिळू दे, सुख शांती सर्व जनी

- प्रा. अरुण सु. पाटील (असु)
(दि.19.11.2018)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults

छान