निर्धोक

Submitted by स्वाती_आंबोळे on 16 November, 2018 - 13:29

सावल्या उंच झाडांच्या ताणून पसरती अंग
केशरी, लाल, सोनेरी पानांत उमलती रंग
जोवर हा उजेड आहे तोवर बोलू निर्धोक
त्यानंतर शब्दांमध्ये मिसळत जाइल काळोख

काळोख उसवतो नीज, रक्तात रुजवतो वीज
स्वप्नांना फुटतिल कोंब नांगरले जर काळीज
आता ना पेलायाचे तसले ते वेडे बहर
तू नकोस लावू ओठी हे शापित काळे जहर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जोवर हा उजेड आहे तोवर बोलू निर्धोक
त्यानंतर शब्दांमध्ये मिसळत जाइल काळोख

खूप सुंदर......

बरेच दिवसांनी वेगळं काही तरी वाचायला मिळालं.
काळोख उसवतो नीज, रक्तात रुजवतो वीज >> कल्पनाचमत्कृती छान आहे. मात्र अर्थ नाही उमगला.
स्वप्नांना फुटतिल कोंब नांगरले जर काळीज >>> आशय छान. नांगरले काळीज हा शब्दप्रयोग जSरा खटकला.

काळोख उसवतो नीज, रक्तात रुजवतो वीज
स्वप्नांना फुटतिल कोंब नांगरले जर काळीज

वाह! सुरेख!

मस्त !

छान

वा!

सर्व प्रतिसाददात्यांचे अनेक आभार. Happy

किरणुद्दीन, कोणत्याही बदलाच्या, सृजनाच्या मागे मुळात असंतोष/असमाधान असतं अशी कल्पना आहे त्यात. काळोख हे त्या असामाधानाचं प्रतीक आहे असं म्हणता येईल. एकदा त्याला वाट दिली की झोप उडते आणि बदलाची स्वप्नं पडू लागतात - जी सत्यात आणणं हे मग एक मोठं उत्तरदायित्त्व होऊन बसतं. सगळं कसं छानच चाललंय असं मानत सुखासीन उजेडात नाहणं तुलनेत किती सोपं नाही का? Happy