स्फुट - आपण !!

Submitted by सुप्रिया जाधव. on 14 November, 2018 - 12:50

तुझ्यात मिसळायला आवडत मला

का तर विचार ?

मी कुठलाही रंग धारण केला ना
तरीही तू सामावून घेतोस मला

आणि

तुझ्याशी वादडायलाही !!

परत विचार ....का ??

कारण

तू कोणतही सोंग काढलस ना ?
तरीही हासून मान डोलावते मी !

भांडतो, ओरडतो, रडतो
शेवटी ऍडजस्ट करतो

मात्र अजिबात कबूल करत नाही

परस्परांवाचून राहू शकणार नाही हे !

कारण

विषाची परीक्षा घेईल कोण ?

मी ही पोळलेली,
तू ही पोळलेलाच !

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users