भाऊबीज

Submitted by Asu on 8 November, 2018 - 22:43

पाटील परिवारातर्फे सर्व आप्तेष्ट आणि रसिकांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा !

भाऊबीज

कार्तिक शुक्ल द्वितियेला
सण भाऊबीजेचा आला
बहीण ओवाळी बंधूराजाला
टिळा लाविते पंचप्राणाला

आठवता परदेशी बंधू राजाला
बहीण पूजिते बंधु चंदू रायाला
धन्य ही संस्कृती नसे तुलनेला
निसर्गाशी जोडी भाऊबीजेला

यम द्वितीयेचा सण आगळा
भावा बहिणीचा प्रेम सोहळा
पवित्र नात्याचा उत्सव सजला
जणू जीवनी नंदादीप पेटला

बहीण विनविते यमराजाला
उदंड आयुष्य दे भाऊरायाला
भाऊ देई ओवाळणी बहिणीला
वचनबद्ध होई बहिण रक्षणाला

भाऊ बहिणीच्या नात्याचा सण
मंगल प्रेमळ नाजूक रूणझुण
बहीण भावाची सदा हितचिंतक
भाऊ बहीणीस संकट विमोचक

- प्रा.अरुण सु. पाटील (असु)
(दि.09.11.2018)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults