अधर्माचे राज्य

Submitted by अननस on 7 November, 2018 - 22:11

अधर्माचे राज्य ऐसी ही लक्षणे
ऐका सर्वजणे तत्परपणे

मानिती वंद्य त्या अधम पुरुषा
सांगती चिंतन अधमांचे

अधम तो पुरुष न करी संतसंग
मातृपितृ ना कधी सेवीतसे

स्वस्त्री पाशी असे नपुंसक
परस्रीचा संग सर्व काळ

निंदी संतजना वंदी हीन जना
देतसे दुःख जो सज्जनांसी

असा अधम पुरुष सदा सांगती थोर
तयाकारणे सुख उन्मत्तांसी

जाण हे राज्य अधर्माचे
देईना कदापि शांतीसुख

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults