संदेश दिवाळीचा

Submitted by Asu on 7 November, 2018 - 08:21

पाटील परिवाराकडून सर्व आप्तेष्टांना आणि रसिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

संदेश दिवाळीचा

तनामनाची सफाई करूनि
देह अंतरबाह्य शुध्द करा
जुनी जळमटं टाकून देऊन
नवे चांगले तुम्ही स्वीकारा

रोषणाई करा तनामनाची
अंधार मनाचा दूर सारा
आनंदकंदील दारी लावा
दीन दुबळ्या द्या सहारा

चांदणे फुलले तुझ्या अंगणी
हवी कशाला चायनामाळ
हास्याचे फटाके फोडण्या
घरात जमले बाळ गोपाळ

आनंदाच्या फुलबाज्या उडवून
आयुष्य दुसऱ्याचे घडवा
मदतीचा पाऊस पाडून
समाधान जीवनी मिळवा

ध्वनि प्रदूषण हवा प्रदूषण
सारे मिळून तुम्ही टाळा
पर्यावरण स्वच्छ ठेवण्या
पर्यावरणाचे नियम पाळा

आप्तांच्या घेऊन गाठीभेटी
नातीगोती तुम्ही घट्ट करा
मेवा मिठाई गोड खाऊनि
गोड बोलणे त्यांचे स्मरा

प्रेमप्रकाश उधळीत जावा
संदेश दिव्याचा ओळखावा
नाती कमवून नाती रमवून
माणूस तितुका मेळवावा

- प्रा.अरुण सु. पाटील (असु)
(दि.07.11.2018)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults