थोडे कथेबाहेरचे

Submitted by onlynit26 on 6 November, 2018 - 00:41

मी जेव्हा २००६ मध्ये मुंबईला आलो तेव्हा नोकरी लागल्यावर सर्वात पहील्या दोन गोष्टी केल्या. पहीली गोष्ट म्हणजे बदलापूरच्या ' ग्रंथसखा 'ग्रंथालयात नाव नोंदणी केली आणि दुसरी म्हणजे स्वताचा आयुर्विमा घेतला. ग्रंथालयात नाव नोंदणी केल्यापासून आधाशासारखी पुस्तके वाचून काढली. तसे शालेय आणि कॉलेज जीवनातही माझे पुस्तक वाचन अफाट होते. दिवाळी आली की दिवाळी अंक माझ्यासाठी पर्वणीच असायचे. त्यातल्या त्यात आवडते दिवाळी अंक म्हणजे ' आवाज ' आणि ' जत्रा '. ग्रंथालयामध्ये गेल्यावर मला कधी कधी उगाचच वाटायचे आपलेही एखादे पुस्तक या रॅकवर असावे. आज माझी कथा असलेला ' आवाज ' दिवाळी अंक घरी आला, पहीलाच दिवाळी अंक असल्यामुळे त्याचे अप्रूप जास्त आहे. ग्रंथालयात पाहीलेले ते स्वप्न मात्र काही अंशाने पुरे झाले आहे.

'आवाज' दिवाळी अंकात माझी कथा छापून येण्यामागे दोन व्यक्तींचे विशेष सहकार्य मला लाभले. प्रसिद्ध लेखक श्री प्रभाकर भोगले यांचे बहुमोल मार्गदर्शन आणि सौ नंदीनी देसाई यांचे प्रुफ रिडींगसाठी झालेले मोलाचे सहकार्य मी नाकारू शकत नाही. मी त्यांचे आभार मानून त्यांना परके करणार नाही पण मनात कृतज्ञतेची भावना आहेच. शिवाय माझ्या कथांचे पहीले वाचक श्री विक्रांत चव्हाण सर व श्री प्रकाश सरवणकर काका आणि सौ प्राजक्ता सामंत यांच्याशी लिखाणासंदर्भातील वेळोवेळी होत असलेली चर्चाही उपयुक्त ठरत आहे.

वेळोवेळी माझ्या लिखाणाला प्रोत्साहन देणारी माझी अर्धांगणी सौ श्रावणी हीचाही माझ्या यशात मोलाचा वाटा आहे.

आणि सर्वात महत्त्वाचे तुम्ही सर्व मायबाप वाचक, तुम्ही माझे लिखान वाचता म्हणून मला लिहावेसे वाटते, तुमचेही शतश: आभार.

माझ्या कथेचे नाव " सुगरणीचा खोपा " , लेखक - नितीन दशरथ राणे .

माझी कथा जरूर वाचा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अभिनंदन नितीन Happy

वाचकाचा लेखक होणे हा प्रवास खूपच सुरेख असतो.

हार्दिक अभिनंदन,

सर्वांची आठवण ठेवणारे हे लिखाण खूप आवडले आहे

मस्त! हार्दिक अभिनंदन नितीन. Happy लिहीत रहा. पण मला तुमच्या कोकणची पार्श्वभूमी असलेले लेख जास्त आवडतात. आवाज अंकातील लेख जरुर वाचु.