Submitted by राजेंद्र देवी on 5 November, 2018 - 07:50
धनत्रयोदशीच्या अनेक शुभेच्छा
शुभेच्छांचा आला पूर
फटाक्यांचा आला धूर
नवंवस्त्रांनी खुलला
नवंललनांचा नूर
सजल्या रांगोळ्या भूवरी
सजले आकाशदिवे चंद्रापरी
सजले लाडू सुक्यामेव्याने
चिवड्यामध्ये करंजी नावेपरी
चकाकले अलंकार
वाढला धनपेटीचा भार
नमन तुला देवा
अनंत तुझे उपकार
राजेंद्र देवी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा