धनत्रयोदशी

Submitted by Asu on 4 November, 2018 - 21:51

*पाटील परिवारातर्फे सर्व आप्तेष्ट आणि रसिकांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !*

*धनत्रयोदशी*

अश्विन कृष्ण त्रयोदशीला
धनतेरस सोन्यात न्हाली
तिजोरीच्या देव्हारी लक्ष्मी
धनदौलत तेजात उजळली

अमृतकुंभ घेऊन हाती
धन्वंतरी आज आले जगती
राष्ट्रीय आयुर्वेद दिस म्हणूया
गाऊ तया आज आरती

दीपदान करू यमा त्रयोदश
पाळू नियम करु त्या खुश
करू प्रार्थना यमा नियमित
अपमृत्यू तो टाळील निश्चित

धनतेरस सण धन्वंतरींचा
आरोग्यरक्षक देवदूतांचा
आरोग्यमंदिर असे दवाखाना
डॉक्टरांप्रती कृतज्ञता जाणा

- प्रा.अरुण सु. पाटील (असु)
(दि.05.11.2018)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults