शेंग चवळी

Submitted by Shivajirao on 30 October, 2018 - 00:00

तोडताना तुला गुलाबाची नाजूक कळी .
दर्शन घडलं होतं तुझं भल्या सकाळी .

सकाळी काढताना रांगोळी
जणू भासे तू शेंग चवळी .

रुप मनोहर काया तुझी सावळी
पाहून तुला माझ्या दातांची बसली कवळी .

तुझ्यात गुंतलो म्या सांज , दूपार येळी .
लई दिसानं भेट आपली त्या शेंद्रया राउळी .

हिंमत माझी थोडी टाकून आलो ढवळी
मॅतर लागली चिडाया गं
पाहून टिकली तुझ्या कपाळी .
'

लाजू नको पोरी अशी होुनशान सोवळी
सांगायला आलो तुजला येरवाळी .

तू लई हैस भोळी
म्हनुण तर माह्या जाळ्यात अडकली मासळी

काळजी नको करू माझ्या कळी
म्या पण दूसरी कटवली तिचं नाव हे सुतळी .

कशा वाटल्या मित्रांनो या ओळी
समजू नका यांना चारोळी .

✒✒शिव ..

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults