लळा!!

Submitted by अदिती जोशी on 25 October, 2018 - 09:15

फलाटावर आलेली गाडी सुटणारच तसं आलेली प्रत्येक व्यक्ती जाणारचं..वैश्विक सत्य चं ते!
हे माहिती असून सुद्धा मन तर गुंततचं असतं...कदाचित त्याला या सत्याची जाणिव नसावी.
मन असं अडकून पडल्यावर मग गाडी सुटण्याची वेळ येते आणि ती निघते सुद्धा..
मग वाटतं "का रे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सुटते"
तेव्हा ते वेडपिसं मन सांगतं की गाडी गेली ती फलाटावर परत येण्यासाठी आणि सुटलेला हात परत हातात येण्यासाठी !

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हृद्य लिहिलं आहे एकदम.
अशाच अर्थाची संदीप खरे आणि सलील कुलकर्णी जोडगोळीची संगीतबद्धं कविता आठवली.