परत तू ये ना

Submitted by shrinand kamble on 24 October, 2018 - 01:27

सांजयेळी दारात उभी राहून माझी वाट पाहणारी तू
तुझी भिरभिरती नजर मला शोधायची मी दिसताच तू गुपचूप गालात हसायची
सांजयेळी संथ वाहणाऱ्या नदीकिनारी
कोकिळेचा गोड स्वर अन वाऱ्याची मंजूळ गाणी किती वेडे होतो ना आपण एकमेकांवरती जिवापाड प्रेम करणारे
खरं प्रेम हे असच असतं म्हणून एकमेकांना समजावणारे
पण का गं समाजाच्या बंधनांनी आपल्यावरती मात का केली ?
इतकं कमजोर होतं का आपल प्रेम ?
आयुष्यभर सोबत राहण्याची वचने आपण एकमेकांना दिली
पण समाजाच्या बंधनापुढे आपली ती वचने वायफळ का गं ठरली
तुझ्यासाठी एकट्यात बसुन रडणारा आज आठवतो का गं मी तुला
तुझ्या एका हाकेला धाऊन येणारा,
तुला वेड्यासारखा शोधणारा,
तू दिसली नाही म्हणून कधीकधी डोळ्यांत पाणी
आणणारा
आज मला तुझी खूप आठवणं येतेय गं
एकटा पडलोय गं मी मला समजावण्यासाठी परत तू ये ना
तू दिलेली ती वचने पूर्ण करण्यासाठी परत तू ये ना
प्लीज परत तू ये ना

© श्रीनंद कांबळे

Group content visibility: 
Public - accessible to all site users