वॉट्सअप वरील लेखन

Submitted by उमानु on 23 October, 2018 - 13:47

माझ्या वाचनात वॉट्सअप वर राजेंद्र वैशंपालन यांच्या अती लघु कथा आल्या त्या इथे कॉपी पोस्ट करू शकते का??

Group content visibility: 
Use group defaults

तुम्ही "राजेंद्र वैशंपालन" असाल तर हो. नसाल तर त्यांना इथे आयडी काढायला सांगा आणि पोस्ट करायला सांगा.
आणखी बेस्ट म्हणजे तुम्ही त्यातुन प्रेरणा घ्या आणि स्वतः प्रयत्न करा की! जमेल तुम्हाला.
त्या कथा धाडकन पोस्ट केल्या नाहीत आणि आधी विचारलंत ते आवडलं.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद अमितव...मी राजेंद्र वैशंपालन नाही आणि त्यांना ओळखतही नाही... अ ल क खूप छान वाटल्या वाचायला ..तो प्रकारही मला पहिल्यांदाच माहीत झाला Happy

त्यांच्याशी संपर्क साधता आला, तर त्यांच्या परवानगीने "राजेंद्र वैशंपालन यांच्या अलक" असा धागा काढण्यास हरकत नसावी.