एक रहस्यमयी डोंगर 1

Submitted by Vaibhav Bhonde on 23 October, 2018 - 03:15

रविवारचा दिवस होता.राम आणि सचिन यांना अभ्यासाचा खूप कंटाळा आला.होता.दोघांनीही कोठेतरी फिरायला जावेसे वाटत होते.मग त्यांनी गावाच्या शेजारी १५ कि.मी अंतरावर असलेल्या डोंगरावर जायचे ठरविले. त्या डोंगराकडे शक्यतो कोणीही जात नसे.त्या डोंगराबद्दल बर्याच अफवा होत्या .
त्या. दोघांनी घरी सांगितले की आम्ही अभ्यासाला अभ्यासिकेत चाललोय. मग ते दोघे सायकलवर डोंगराकडे रवाना झाले. लांबूनच ते डोंगर त्यांंना दिसत होते.खूपच सुंदर होते ते डोंगर . हिरवीगार झाडे ,वेली होत्या .तो परिसर अतिशय रम्य होता .ते डोंगरावर पोहोचले तोपर्यंत दुपार झाली होती. सगळ्यात अगोदर त्यांनी जेवून घेण्याचे ठरविले. मग ते जेवले.आता त्यांनी डोंगर पाहायचे ठरविले.
खूपच सुंदर होते ते डोंगर .पण पण एक वाईट शक्ती त्या डोंगरात वावरत होती. ती शक्ती त्यांच्यावर नजर ठेवून होती. त्यानंतर राम.आणि सचिन झाडे-झुडपे बघू लागले. डोंगराच्या झर्यातून पाणी पडत होते. दोघांना याचे आश्चर्य वाटले की एवढे सुंदर डोंगर पण इथे एक पण पक्षी नाही. एकाही पक्ष्याचा चिवचिवाट ऐकायला येत नव्हता. यावरूनच त्यांना इथे काहीतरी अमानवीय शक्ती आहे याची
जाणीव व्हायला लागली होती . पण ते तसेच डोंगर पाहत-पाहत मध्यभागी आले.मध्यभागी खूपच दाट झाडी होती. दोघांना पण थोडी भीती वाटायला लागली. एवढ्यात
गार.वार्याचा झूळुक आला आणि पानांची सळसळ ऐकायला आली, त्या दोघांच्या अंगावर काटाच उभा राहिला.
ते अजूनच पुढे जात राहिले.आता ते द्ष्ट्र शक्तीच्या नियंत्रणात असलेल्या जागेत घुसत होते.

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users