इंटरनेटवरचे सुरक्षित (?) व्हिडिओज!

Submitted by यक्ष on 14 October, 2018 - 05:05

नुकत्याच - एका इंटरनेटवरच्या सुरक्षित व्हिडिओज संदर्भात चर्चेदरम्यान 'जर तुम्ही इंटर्नेटवर असाल तर सगळ्यांना (च) दिसू शकाल (if you are on internet- you are visible to all) ' ह्या वाक्यावर धमासान ऐकले.
त्यात सुरक्षित माहिती विषयी चर्चा जरा ज्यास्तच रंगली! नुकत्यात फेसबुक्च्या ३ कोटी युझरसाची माहीती चोरिला गेल्याचे वर्तमान ऐकले.
आत्तापर्यंत सरकारी 'गोपनीय माहिती' ही 'शू:SSS! कुण्णाल्ला सांगू नका!!' ह्या धर्तीवर सगळ्या जगाला ठाउक असते हे महित होते. पण इंटरनेटविषयी मला लिमिटेड जानकारी असल्याने माझ्या काही समजुती ह्या 'घोर गैरसमजुती' आहेत हे नविन पिढीने ठणकावून सांगितले. त्यात कुठलेही व्हिडिओज हे सर्रास डालो करता येतात हे वर्तमान एका आय.टी. फ्रेशरने अगदी सहजपणे सांगितले.
आणी माहिती तुम्ही इंटर्नेटवर उपलब्ध करून दिली आहे नं? मग तो बघण्याचा आमचा हक्क आहे! त्यात एथिक्स फिथिक्स गेले खड्ड्यात अशी भावना प्रकर्षाने जाणवली!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईंटरनेटच कश्याला, तुम्ही एखादी वैयक्तिक गोष्ट तुम्ही सोडून बायकापोरांना आईवडिलांना गर्लफ्रेंडला जवळच्या मित्रांना अगदी कोणाकोणाही एखाद्या व्यक्तीशीही शेअर केलीत की ती खाजगी राहील अशी अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. जे तुमच्या मनात असते तीच तुमची प्रायव्हसी. हे ध्यानात घेउनच मग प्रायव्हसीच्या अवाजवी अपेक्षा बाळगू नयेत.

बर्‍याच लोकांना हे माहित नसते - त्यांना फेसबूकवर आपले नाव, फोटो जगाने पहावेत असे वाटते.
स्वतःचे कौतुक व्हावे असे कुणाला वाटत नाही?
पण त्यात अनवधानाने आपली सिक्रेट्स पण बाहेर पडतील याची जाणीव नसते.

आपण स्वतःच घेतलेले आणि आपल्या सेलफोनवर स्टोअर करून ठेवलेले फोटोज आणि व्हीडिओज किती सुरक्षीत असतात? कुणी ते सहजासहजी हॅक करू शकेल का?

Anything can be hacked and if you are famous etc.chances are more. Why hackers will not waste his time for ordinary people? So it is better to improve cyber hygiene. Happy