जब देखनेवाला कोई नहीं......

Submitted by पशुपत on 11 October, 2018 - 01:39

मला नेहमी एक प्रश्ण पडतो कि जीवनातून "परिक्षा" काधून टाकल्या तर काय होइल?
९० टक्के लोक आनंदाचा जल्लोष करतील ! त्यांना त्यांचे करपून गेलेले लहानपण आठवेल , ते शालेय-महाविद्यालयीन जीवन असे तणावरहित पद्धतीने जगायला मिळणे हे किती आनंददायी असेल ! फक्त आणि फक्त खेळणे , धम्माल करणे , भटकणे , वाचणे , सिनेमा-नाटक पहाणे .... किती किती आणि काय काय करू.. काय कमाल करता येइल

जरा खोलात जाउन विचार केल्यावर मनात आले कि हे सारे किती काळ आनन्द देइल ? केती वेळ मन रमवेल ?
आणखीन खोलात गेलो तर असे लक्षात येइल कि खेळात हार-जीत नसेल , इतरही गोष्टींमधे दर्जा नसेल , श्रेष्ठवाचे - नाविन्याचे - उत्र्कुष्ठतीचे कोंदण नसेल तर कुठलीच गोष्ट मनाला फार काळ आनंदी करू शकणार नाही.
काल मी १०० मीटर अंतर १४ सेकंदात पळालो .. एक महिन्यानीही जर मला १४ सेकंदच लागत असतील तर कशाला उगाच ही उठाठेव ; असे वाटू लागेल. पण एक महिन्याने मी जर हेच १०० मीटर अंतर १२ सेकंदात पळालो तर प्रचंड उत्साह वाढेल. आणि पहिल्या क्रमांकाचा धावपटूचे टाइमिंग ११.३ सेकंद असेल तर मी सहज हे करू शकेन .. नव्हे करूनच दखवतो... असा विचार मी करू लागेन
म्हणजे विकास-प्रगती होण्यासाठी विविध गोष्टींमधे स्पर्धात्मक चढाओढ हवीच ! त्याशिवाय प्रगती नाही. समोर तुल्यबल प्रतिस्पर्धी नसेल तर स्वतःच स्वतःशी स्पर्धा करावी लागते.. आणि कालच्या स्वतः पेक्षा स्वतः ला उंचावावे लागते तेव्हा खरा आनंद मिळतो...
मग या स्पर्धेमुळे किंवा परिक्षेमुळे आपण दु:खी का होतो ?
पहिले कारण हारण्याची , नापास होण्याची भीती !
दुसरे कारण म्हणजे अतिरेकि अपेक्षा .. या जास्ती करून पालकांना असतात आपल्या मुलांकडून...
दोन्ही बाबतीत पालकांनी; मुलांच्या मनावर आणि जीवनावर या अपेक्षांमुळे दुष्परिणाम होउ न देण्याचे भान , याचे तारतम्य बाळगले पाहिजे. मुलांना पराकोटीचे प्रयत्न करूनही जमत नसेल तर मार्ग बदलणे आवश्यक असल्याचे वेळेवर स्वीकारणे जमले पाहिजे.
आनखीन एक प्रकारचा पालक वर्ग असतो , ज्यांना आपला मुलगा-मुलगी हे "पहिलेच" यायला हवे असतात. त्यांनी मुलांना सर्वोत्कुष्ठ प्रयत्न करायला उद्युक्त करायला हरकत नाही पण ते सारे मुलाला स्पर्धेचा आनंद देणारे असायला हवे. आणि एकदा परिक्षा होउन गेल्यावर येणारा परिणाम उत्साहाने , आनंदाने स्वीकारून पुढे जाण्याची खिलाडू व्रुत्ती सुद्धा हवी.

हीच प्रगती घडवून आणणारी स्पर्धा जीवनाचा भाग बनून जाते आणि विविध रूपात आयुष्यभर मनुष्याला पळवत रहाते. बदलतात विषय , बदलतात प्रतिस्पर्धी , बदलतात परिक्षक , बदलतात यशस्वितेची परिमाणे..बदलते आनंदाची परिभाषा.. बदलते समाधानाची पातळी...
बदलतात ध्येये !
बदलतात "कारणे" ज्यांच्या साठी ही सङळी उठाठेव करायची .

पुढे जीवनात अशी अवस्था येते की या आनंदाचे ठिकाणही आपल्या देहाच्या बाहेर जाते . ते जाऊन बसते आपल्या आई - वडील ,पती-पत्नी , आपली मुले , मित्र्,गुरू यांच्या ठाई...
आपली सारी धडपड चालते यांना आनंदी करण्या साठी.. त्यांच्या चेहेर्यावर समाधान आणण्यासाठी....त्यांची शाब्बासकीची थाप पाठीवर पडण्यासाठी.
हे सगळे चालते , कोणीतरी तिथे बसले आहेत , त्यांच्यासाठी, जे मला पहताहेत .. मी यशस्वी झालेलो .. मी जिंकलेलो...
हे करताना कितीही धडपडलो , दुखापती झाल्या , वेदना झाल्या , तरी त्याचे क्लेष किंचितही जाणवत नाहीत.
कोणीतरी हे कोउतुकाने पहायला हवे असते प्रत्येकाला....

आता प्रष्ण परत येतो कि मग आपण स्वतःसाठी कधी जगणार ???

उत्तर सोपे आहे. एकतर आपण या सगळ्या दुनियादारीत स्वतः चा आनंदच दुसर्या कुणालातरी आनंदी पहाण्यात सोपवून टाकतो....

आणि सर्वात महत्वाचे उत्तर म्हणजे
आपण स्वतःच ...दुसर्या कुणाच्या तरी आनंदाचे कारण बनून रहाणे .....
कारण
देखनेवाला कोइ तो चाहिये ...

जब देखनेवाला कोइ नही
बुझ जाओ तो क्या जल जाओ तो क्या....

Group content visibility: 
Use group defaults

मला लेखाचे शेवटचे दोन परिच्छेद एकमेकांशी काँट्रॅडिक्ट करणारे वाटले.
बाकी लेखाशी सहमत.

जब सम्भालनेवाल कोई हो, तो गिरने मे मजा है,
नही तो मिरची भजा भी साधा भजा है"
शिर्षक वाचुन हा बालपणीचा Wink सुविचार Proud आठवला
---------------------------------------------------------------------------
हीच प्रगती घडवून आणणारी स्पर्धा जीवनाचा भाग बनून जाते आणि विविध रूपात आयुष्यभर मनुष्याला पळवत रहाते. बदलतात विषय , बदलतात प्रतिस्पर्धी , बदलतात परिक्षक , बदलतात यशस्वितेची परिमाणे..बदलते आनंदाची परिभाषा.. बदलते समाधानाची पातळी...
बदलतात ध्येये !
बदलतात "कारणे" ज्यांच्या साठी ही सङळी उठाठेव करायची .+१११११

इन शॉर्ट (शेवटच्या दोन परिच्छेदाचे सार. कारण त्याआधीचे परिच्छेद वेगळेच वाटतात).. आपण काहीतरी अचिव्ह केल्यावर त्याचे कौतुक वाटेल अश्या व्यक्ती आजूबाजूला हव्यात. तसं कोणीच नसेल तर त्या यशाला काही अर्थ नाही (??).