उध्वस्त वादळ....

Submitted by पाडस. on 7 October, 2018 - 07:17

एकदा मनात वादळ उठलं,
त्या वादळान मनाच जंगलच पेटलं.

मग थेट तिलाच गाठलं,
लगेच कस विचाराव असही वाटल.

काही विचारायचा धीरच होईना,
ओठावरला शब्द बाहेरच जाईना.

मग घेतली तिच्या मनाची फिरकी,
तेंव्हा कळलं हि सुद्धा आपल्याच सारखी.

मग बोललो दुसऱ्याच्या प्रेमातल,
म्हटलं वेळ आली कि सांगावं आपल्याही मनातलं.

पण मी काय म्हणतोय हे येईना तिच्या ध्यानात,
वाटल आपल प्रेम राहतंय कि काय मनातल्या मनात.

शेवटी सांगून टाकल तिला एकाच दमात,
त्यावर ती म्हणाली तू तर नुसता आहेस वेड्यांची जमात.

एव्हडस सांगायला फार वेळ केलास,
स्वतःच्या आयुष्याचा मोठा खेळ केलास.

माझ्या मनाला कुठंतरी स्पर्शून हि गेलास,
माझा प्रियकर नाही पण चांगला मित्र तरी झालास.

कारण आता माझं सार आयुष्यच फिरलय,
तुला सांगाय साठी एव्हढच उरलय,
तू येण्या अगोदर माझं लग्नही ठरलय.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults