१८० अंश - एक अश्लील कविता

Submitted by किरणुद्दीन on 5 October, 2018 - 02:07

" पुरूषांच्या नजराच वाईट "
" आत्ता ! मी काही केलं का ?"
" तुम्ही नाही हो, फेसबुकवर "
" आँ !!"
"नाही तर काय, सेल्फी टाकायचा अवकाश, ही रांग लागते कमेण्ट्सची "
" मग नका टाकू हो "
" काय ?"
" सेल्फी "
" तुम्ही कोण ठरवणार बायकांनी काय करायचं ते ?"
" अरेच्च्चा ! मी आपलं सुचवलं "
" राहू द्या तुमची सूचना तुमच्या जवळ, बाईलाच बरे असले सल्ले देता ते "
" अहो त्रास होतो म्हणून म्हटलं, ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी "
" पुरूषांना का नाहीत सांगत ते ?"
" काय ?"
" हेच की , सेल्फी नका टाकू म्हणून "
" कारण त्यांना त्रास होत नाही "
" वा वा वा... ! काय पण कारण "
" खरंच होत नाही "
" म्हणजे बायका त्रास देत नाहीत असे म्हणा "
" हो तसे तर तसे "
" मग पुरूष का देतात त्रास ?"
" बायकांना आवडते म्हणून. पुरूष काय बघायची वस्तू आहे का ?"
" कोण म्हणतं असं ?"
" काय ?"
" पुरूष काय बघायची वस्तू आहे का ?"
" मला वाटतं असं "
" तुम्ही बाई आहात का ?"
" असं का विचारताय ? नाहीच ना "
" मग तुम्हाला कुठून ठाऊक असणार "
" आता माझी मती गुंग होऊ लागलीय "
" बायका पण करतात की कमेण्टी. फक्त आयटेम असला पाहीजे "
" कसला आयटेम ?"
" श्शी बाई ! कसं सांगायचं ? अहो हॅण्डसम असला पाहीजे "
" बघा .. आता तुम्हीच म्हणताय म्हणून समजले. नाहीतर परत म्हणाल बायका नाहीत असं काही वागत ते "
" नाहीच ना वागत "
" बघा आता पुन्हा "
" अहो म्हणजे पुरूषांसारखं दिसलं बाई की लागले लाळ घोटायला असं नाही करत बायका "
" एक मिनिट... मी आता कन्फ्युज झालोय, म्हणजे कमेण्ट करतात कि नाहीत करत ?"
" म्हणजे करतात. पण लल्लु पंजूच्या फोटोवर नाही. हॅण्डसम कुणी असेल तर ते पण हेल्दी फ्लर्टिंग असतं "
" हेल्दी फ्लर्टिंग हे काय असतं ?"
" ते तुम्हाला नाही कळणार "
" का ?"
" त्यासाठी हॅण्डसम असायला लागतं "
" बाब्बौ !!! "
"....."
"पण मग पुरूष करतात ते काय ?"
" लाळघोटेपणा "
" आँ ! "
" नाहीतर काय ?"
" दोन्हीत काय फरक ?"
" चांगलाच फरक आहे "
" एक मिनिट. मला कांदा हुंगवा "
" का हो ?"
" गरगरतंय "
" घ्या, हुंगा "
" अहो तुम्ही त्या गुर्जींच्या कवितेवर एकदा तलवार उपसली होती तेव्हांपासून टरकूनच असतो मी "
" कुठल्या ?"
" विद्रोही कवितेवर अश्लील म्हणून आरोप केला होता तुम्ही. बायकांच्या अवयवावाचून व्यक्त होता येत नाही का असा स्टान्स होता बघा "
" आठवलं. मग बरोबरच आहे ना. पुरूषांवरून करतं का कुणी कविता ?"
" पुरूष काय वर्णन करायची वस्तू आहे ?"
" कुणी सांगितलं ? "
" बरं बरं. समजलं "
" पण मग परवा भिल्लीणीच्या प्रसववेदनांनी आनंदलेली योनी यावर तुम्ही उल्टाच पवित्रा घेतला "
" हो मग "
" ती अश्लील नाही का ?
" त्या मागचा अर्थ निर्मळ नाही का ?
" पण योनी आनंदली हे अश्लील नाही का ?"
" का भिल्लीण सोडून इतरांच्या योनीबद्दल चालतं कि काय तुम्हाला ?"
" अहो बाई, भिल्लीणीच्या योनीबद्दल लिहीलं तरी ती बाईच नाही का ? मग बाईच्या अवयवांबद्दल लिहीलेलं चालत नव्हतं ना ?"
" कवीचा उद्देश पाहिला तर मी त्याच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या बाजूने आहे "
" बरं मग अश्लीलतेचं काय ?"
" फक्त जात पाहून अश्लील वाटते का कविता ?"
" कांदा "
" काय ?"
" अहो कांदा द्या, गरगरतंय "
" खड्ड्यात जा ! स्त्रीविरोधी मानसिकता, जातीयवादी, अश्लील... सगळे मेले पुरूष सारखेच !"

( शीर्षक मार्केटिंगचा भाग होतं )

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बापरे डोकं जाम गरगरलं
जमलं तर डायलॉग चे कर्ते प्रत्येक डायलॉग पुढे लिहा
स्त्री: -----
पुरुष: ------

इथे view सिस्टिम नाहीय, त्यामुळे शीर्षक मार्केटिंग ने फरक पडणार नाही Light 1
प्रतिसाद सिस्टिम आहे - हा घ्या माझा एक प्रतिसाद धागा वर आणायला ☺️

बब्बन, मी अनु, देवकी, शाली, आशुचँप, मानवपृथ्वीकर, चौ.रा. आपले सर्वांचे आभार .

च्रप्स Lol
तुम्ही मार्केटिंगला फसून थोडीच ना क्लिक केलेलं ? Lol

मी मार्केटिंग चा बकरा. Rofl
किरणुद्दीन छान ! मनापासून पटले.

खुद्द जव्हेरगंज इथे? वा वा !!
सरजी नवीन काही लिहा ना वाचनाची भुक भागेल असे.

जव्हेरगंज, शाली, निरू, नॅक्स, अ‍ॅमी, बन्या आभार सर्वांचे.
पाथफाईंडर - इतके प्रामाणिक असू नये Lol