जर-तर…

Submitted by Asu on 3 October, 2018 - 02:48

जर-तर…

वाचायला जर कुणी असेल
तर लिहायला बरं वाटतं
एेकायला जर कुणी असेल
तर सांगायला बरं वाटतं
जेवायला जर कुणी असेल
तर रांधायला बरं वाटतं
अश्रू पुसायला जर कुणी असेल
तर रडायला बरं वाटतं
समजवायला जर कुणी असेल
तर रूसायला बरं वाटतं
सेवा करायला जर कुणी असेल
तर आजारी पडायला बरं वाटतं
प्रेम करायला जर कुणी असेल
तर जीव आेवळायला बरं वाटतं
ध्येय द्यायला जर कुणी असेल
तर जगायला बरं वाटतंं
जीवाला जीव द्यायला जर कुणी असेल
तर लढायला बरं वाटतं
देव म्हणायला जर कुणी असेल
तर दगड बनायला बरं वाटतं
शोक करायला जर कुणी असेल
तर मरायलाही बरं वाटतं

- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults