तुलाही त्रास होतो ना मला मी त्रास देताना ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 2 October, 2018 - 15:17

स्वतःपासून थोडेसे स्वतःला दूर नेताना
मला मी जाणते आहे तुला समजून घेताना

नको सांगूस काहीही, मलाही माहिती आहे
तुलाही त्रास होतो ना मला मी त्रास देताना ?

कशीशी चुकविली होती विचारांची तुझ्या गर्दी
बरोबर गाठते खिंडीत माझी वाट येताना

तुझ्या चांगुलपणाबद्दल कुठे संदिग्धता आहे ?
मलाही दे जरासा त्यातला इतरांस देताना

असे नाहीच की माझ्यापुढे पर्याय नाही...पण
तुझा खांदातरी देशील ना उचलून नेताना ?

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असे नाहीच की माझ्यापुढे पर्याय नाही...पण
तुझा खांदातरी देशील ना उचलून नेताना ?

मस्त