आभास

Submitted by किरणुद्दीन on 2 October, 2018 - 01:47

आहे लढा मनाशी
माझाच ओळखीचा
होतो तुझा फिरूनी
आभास सोबतीचा

मी घाबरू कशाला
रानातल्या आगीला
बघ संगतीस आहे
काळोख काळजीचा

मनिषाच मिथ्य होती
आलो कुठून कोठे
भासात जो पकडला
तो हात सावलीचा

आली कधी घराला
कविता फिरून माझी
सांगा तिला बदलला
पत्ता हा अंतरीचा

धुंदीत मैफिलीच्या
रंगात गुंग होतो
ऐकून जाग आली
आलाप भैरवीचा

-़ किरण

Group content visibility: 
Use group defaults

छान.

छान ....

किरणजी , आपण ते प्रतिसादाचे बाजूला ठेवा . पण येक नंबर बनली आहे हि . येक नंबर , काय ,, बोलायचंच काम न्हाय ..

छान
काळोख काळजीचा
की
काळोख काजळीचा

आली कधी घराला
कविता फिरून माझी
सांगा तिला बदलला
पत्ता हा अंतरीचा >> छान

पण वाचतांना वाटले की कवितेला आता मूळ कवीचा 'ड्यू आय डी आहे' असे सांगताय की काय! Biggrin

वाह! सुंदर!
परत परत वाचली..

मनिषाच मिथ्य होती
आलो कुठून कोठे
भासात जो पकडला
तो हात सावलीचा

आली कधी घराला
कविता फिरून माझी
सांगा तिला बदलला
पत्ता हा अंतरीचा
>>>

या ओळी वाट्सप स्टेटस म्हणुन वापरण्याची परवानगी मिळेल काय (अर्थात कवीच्या नावासकट)?

या ओळी वाट्सप स्टेटस वापरण्याची परवानगी मिळेल काय >>>> नक्कीच ! नेकी और पूछ पूछ