शब्दप्रभू गदिमा

Submitted by Asu on 30 September, 2018 - 23:17

आधुनिक वाल्मिकी शब्दप्रभू गुरुवर्य ग. दि. माडगूळकर व स्वरप्रभू सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त -

शब्दप्रभू गदिमा

शब्दप्रभू शब्दांचे सागर
गदिमा दैवाचा चमत्कार
शब्दांमधुन रत्ने घडविली
गुंफिले मौलिक रत्नहार

गीतरामायण बांधिले मंदिर
महामुनि थोर तुझे उपकार
बाबूजींच्या मधुर स्वरांसह
केला त्रिभुवनात संचार

वाल्मिक मुनी तू खरोखर
शब्दसृष्टीचा महारत्नाकर
साध्या शब्दात पेरून ताल
बांधियले भव्य स्वरमहाल

सरस्वतीस अर्पियले तू
शब्दांचे दिव्य अलंकार
वीणेतून वाजविलेस तू
नादमधुर स्वर झंकार

सिनेसृष्टी वदे तुझीच वाणी
दिलीस तू अति मधुर गाणी
कथा काव्य कादंबरी सुंदर
रचल्यास किती तू कलंदर

ऋण तुझे सारस्वतावर
या जन्मी ना फिटणार
जन्म घेऊन पुन्हा पुन्हा
करा आम्हांवर उपकार

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults