भूक.

Submitted by पाडस. on 30 September, 2018 - 06:55

माझ्या लहानपणी नेहमी असच व्हायचं,
भुकेलं पोट रोज हवाच खायचं.
पोटाला झळ बसली तरी,
डोळ्यांनी किती वाहायचं.

कधी-कधी शेजारच्या काकूंनी,
भाकरीचा तुकडा आणून टाकायचं.
आमच्या पोटात मग,
जंगलातला वनवाच पेटायचा.

आईच्या हातानी तो आम्हा भावंडात सामान वाटायचं,
आम्ही मग मेजवानीचा आनंदच लुटायचा.
यात मात्र,
आईला एक घासही नाही भेटायचं.

पाण्याचा तांब्या पोटात रिकामा व्हायचा,
भुकेचा अग्नी शमविण्या तोही हतबल राहायचा.
असाच दिवस तीन काढायचा,
संसाराचा रहाटगाडा एकटीनेच ओढायचा.

असेच कसेबसे दिवस तीन सारले,
धुळीबरोबर उडणाऱ्या मातीत उद्याचे अंकुर पेरले.

आता त्या अंकुराची झाडं झाली,
फळ-फुलांनी बहरून गेली.

आता पोट असलं तरी भूक नाही,
आग आहे पण पाणी नाही .

आता नसे भूक तरी पंच-पक्कवानाचे ताट पुढ्यात येई .
पण हे पाहायला कुठे आहे माझी आई? कुठे आहे माझी आई????

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

भारी लिहीलय
फक्त् तीन च्या जागी तिनं हा बदल योग्य वाटतो Happy

नवीन आहे माबो. वर अजून मराठी टायपिंग जमत नाहीये. तरीही धन्यवाद तुम्ही दिलेल्या सूचनेबद्दल.
पुढच्या वेळी नक्की लक्ष्यात ठेवेन.