जिच्यामधे मन गुंतत जाते

Submitted by सुप्रिया जाधव. on 30 September, 2018 - 05:51

आपत्तीचा सुटतो वारा
उद्वेगाच्या संततधारा
आठवणींची विज कोसळते
जिच्यामधे मन गुंतत जाते

गारठून जाते अभिलाषा
सौख्य गळे, गुंडाळुन गाशा
घोर निराशा पदरी पडते
जिच्यामधे मन गुंतत जाते

परिस्थितीचे चटके बसती
फसवत जाती मृगजळ नसती
खुळ्या जिवाची तगमग होते
जिच्यामधे मन गुंतत जाते

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपत्तीचा सुटतो वारा
उद्वेगाच्या संततधारा
आठवणींची विज कोसळते
जिच्यामधे मन गुंतत जाते

गारठून जाते अभिलाषा
सौख्य गळे, गुंडाळुन गाशा
घोर निराशा पदरी पडते
जिच्यामधे मन गुंतत जाते

परिस्थितीचे चटके बसती
फसवत जाती मृगजळ नसती
खुळ्या जिवाची तगमग होते
जिच्यामधे मन गुंतत जाते

विश्वासाचा उडतो पारा
धूसर दिसतो खरा चेहरा
प्रेमावरची श्रद्धा नडते
जिच्यामधे मन गुंतत जाते

सुप्रिया