ओंजळीतलं चांदणं.

Submitted by पाडस. on 30 September, 2018 - 05:40

अजूनही आठवतेय ती दिवाळी,
हाड चिंबवणारी थंड हवा हिवाळी.

प्रत्येक घरात फराळांची आरास सजली होती,
आई बिचारी मात्र कोपऱ्यात विचार करत बसली होती.

प्रत्येकाचा पैशाने खिसा भरला होता,
आमच्याकडे मात्र भाकरी-भाजीसाठीही पैसा नव्हता.

आमच्याकडे बघून लोक लागत होते हसू,
अजूनही आठवतंय आईच्या डोळ्यातून वाहत होते आसू.

घराघरातून फराळांचा सुवास दरवळत होता,
मला त्यापेक्षाही जास्त आईचा सहवासच हवा होता.

हेवा वाटत होता मला,
त्या नवीन कपड्याचा नि त्या मुलांचा.
मला फक्त वास येत होता त्या धोतऱ्याच्या फुलांचा.

बाहेर फटाकड्यांचे कडकडाट होत होते,
मी फक्त त्यांना पाहून समाधान मनात उभा होतो.

आणि मी एक स्वप्न पाहत होतो,
आपल्याकडेही असं असत तर??

आणि अचानक थंड हवेची झुळुक यावी तशी थंड विचाराची लहर घेऊन आला वारा,
आणि माझ्याही डोळ्यांना अक्षरशः लागल्या होत्या धारा.

घेऊन घेऊन घेणार काय?
आमची एवढी ऐपत न्हवती.
तरीही माझी आशा काही संपत नव्हती.

तेंव्हा जाणवलं,
जरी कोणालाच नसली माझी कदर,
तरी मला आधार देईल आईचाच ओला पदर.

स्वप्नातून आता मी जागा झालो होतो,
पुन्हा ते स्वप्न पाहायचं नाही असाच स्वप्न मी पाहत होतो.

तसाच पळत -पळत जाऊन आईला म्हणालो होतो,
"नको ते मला नवीन कपडे नि नको ते फराळ,
नको ती दिवाळी आणि नको ते फटाके,
जाणवतंय मला तुझ्या मनाला किती बसताहेत चटके"

माझे ते शब्द ऐकून आईचा आला होता भरून ऊर ,
आणि आठवतंय तिच्या डोळ्यातील गंगा-जमुनेलाही आला होता महापूर.

दिवसामागून दिवस भराभर उलटतात,
इतिहासाची पान मात्र पुन्हा मागे पालटतात.

मागे वळून पाहताना डोळे येतात भरून,
आणि पसाभर ओंजळीत साठवलेल्या चांदण्यात ते सोनेरी क्षण जातात विरून.

Group content visibility: 
Use group defaults