शार्प ऑब्जेक्टस्

Submitted by ॲमी on 29 September, 2018 - 08:28

Persephone :
Daughter of Demeter and Zeus. She is Greek Goddess of Spring and also the Queen of the Underworld. Her story is one of abduction, love, grief, and celebration.

===
ओसाड रस्ते, रिकामे मॉल, ग्राफिटी केलेल्या भिंती, तुरळक कुठेतरी दिसणारी, वारा घेत बसलेली एखाददुसरी व्यक्ती. अशा सुनसान गावातुन दोन लहान मुली स्केटिंग करत चालल्या आहेत. एक टॉमबॉईश आहे हॉटपॅन्ट-टीशर्ट, छोटेछोटे केस. दुसरी अगदी तिच्या उलट, नाजूक फुलासारखी, फिकट रंगाचा फ्रॉक, दोन बो वगैरे. ती विचारते "आपण घराबाहेर हुंदडत फिरतोय हे आईच्या लक्षात नाही ना येणार?". पहिली बेफिकरीने म्हणते "Better hope not".

लपतछपत हळूच दार उघडून त्या घरात येतात. आई स्वैपाकघरात मग्न आहे. वडील काहीतरी वाचतायत. आवाज न करता जिना चढून त्या एका खोलीत जातात. बाकीच्या व्हिक्टोरियन वाटेल अशा खोल्यांपेक्षा ही खोली वेगळी आहे. सामान अस्तव्यस्त पसरलं आहे, भिंतीवर ओबामाचे चित्र आहे, बाथरुमदेखील मॉडर्न वाटतेय. पलीकडे बेडरूममध्ये एक बाई गाढ झोपलीय. टॉमबॉय मुलगी खिशातून पेपरक्लिप काढते आणि त्या बाईच्या हाताला जोरात टोचवते. आणि कमिल प्रिकर खडबडून जागी होते. ते स्वप्न होतं कि बालपणीची आठवण? कि भविष्याची चाहूल??

कमिल (Amy Adams) ही सेंट लुईस शहरात क्रोनिकलमधे गुन्हेवार्ताहर म्हणून काम करणारी, ३३ वर्षांची अविवाहित स्त्री आहे. ऑफिसात पोचल्यावर लगेच तिचा संपादक तिला बोलावून घेतो आणि जन्मगाव विंडगॅपबद्दल माहिती विचारतो. सहज गुगलून मिळेल अशी माहिती ती सांगते. गेल्यावर्षीच तिथे ऍन नॅश या १३ वर्षाच्या मुलीचा खून झाला आहे आणि आता काही दिवसांपूर्वी दुसरीएक त्याच वयाची मुलगी नताली किन हरवली आहे. कमिलला याबद्दल काहीही माहिती नाही. सीरिअल गुन्हे असतील, इतर कोणतेही वर्तमानपत्र ही बातमी कव्हर करत नाहीय, कमिल काहीतरी स्थानिक-वैयक्तिक रंग देऊन लिहू शकेल असे वाटल्याने बॉस तिला विंडगॅपला जायला सांगतो. ती फार अनुत्सुक आहे जायला पण मग दुसरा पर्याय काय?

जवळपास आठ वर्षांनी कमिल जन्मगावी जातेय. विंडगॅपमधे पोहोचल्यावर ती सर्वप्रथम मुख्य पोलीस अधिकारी व्हिकरीला भेटते. त्याला खात्री आहे कि ऍन आणि नताली दोन्ही केसमधला गुन्हेगार गावाबाहेरचा, पुरुष आहे. विंडगॅपला लागून असलेल्या जंगलात नताली शोधमोहीम चालू आहे तिकडे कमिल जाते. तिथे तिला तीन हॉट टीनेजर मुली भेटतात. ऍनचा खुनी शोधण्यास मदत करायला कॅन्सस सिटीहून आलेला FBI अधिकारी भेटतो. आईची बालपणापासूनची मैत्रीण भेटते. इतर ओळखीचे लोक भेटत राहतात. कमिलदेखील शोधकार्यात सामील होते. बऱ्यापैकी रात्र झाल्यानंतर ती घरी जायचे ठरवते.

कमिलची आई अडोरा (Patricia Clarkson) ही गावातली पोर्क मुघल आहे. विंडगॅपमधील गरिबांकडे कामाचे दोनच पर्याय आहेत. मूठभर श्रीमंताकडे घरकाम करायचे किंवा अडोराच्या पिगफॅक्टरीत हॉग बुचरिन्ग. अडोरा म्हणजे विसंगतीचा, विरोधाभासाचा मूर्तीमंत नमुना. दिसायला, वागायला, बोलायला एकदम खानदानी, नाजूक वगैरे. पण कमिलशी/बद्दल बोलताना मात्र तिला काय होत कळत नाही. दोघींचे नाते फार तणावग्रस्त आहे. कमिलचे सावत्र वडील ऍलन हे गाणी ऐकणे आणि बायकोला उगीउगी करणे याखेरीज काही करत नाहीत. त्यांची १३ वर्षांची मुलगी, कमिलची सावत्र बहीण ऍमादेखील घरात आहे पण सुरवातीला तिचे फक्त अस्तित्व कमिलला जाणवत राहते.

२ दिवसांनी पोलिसस्टेशनच्या मागच्या गल्लीतच नतालीचा मृतदेह सापडतो. कमिल तेव्हा तिथे जवळपासच्या भागातच असते. ऍनसारखेच नतालीचेदेखील सगळे दात काढून घेतलेले असतात.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी अडोराच्या घरात असताना नाजूक फुलासारखी, फिकट रंगाचा फ्रॉक घातलेली ऍमा (Eliza Scanlen) कमिलला दिसते आणि तिला आश्चर्याचा धक्का बसतो.

• त्यामागे काय कारण आहे?
• अडोरा कमिलचा एवढा तिरस्कार का करते?
• पहिल्या सिनमधे स्केटिंग करत जाणाऱ्या मुली कोण होत्या?
• ऍन आणि नतालीचा खून कोणी केला?
आणि सगळ्यात महत्वाचे
• कमिल ही अशी बेवडी, दुखावलेली, जगाचे ओझे खांद्यावर असल्यासारखे चालणारी/वागणारी का आहे?
या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर Sharp Objects बघा.

===
जिलियन फ्लिन ही एक अतिशय खत्रुड लेखिका आहे. तिचे लेखन कुरुप असते, हिडीस असते. आपल्या कथेतील स्त्रीव्यक्तीरेखांचा वाचकाने तिरस्कार करावा, त्यांना घृणा वाटावी, बाब्बो असली कुठे बाई असते का असे म्हणत त्यांनी तोंडात बोटं घालावीत असे तिला वाटते. गॉन गर्ल वाचलेल्या/बघितलेल्या लोकांना माहित असेल फ्लिनच्या नायिका सोनेरी केसांच्या, निळ्या डोळ्यांच्या, श्रीमंत घरातल्या, सभ्य, सुसंस्कृत वगैर असतात. बाहेरून. आतून बघितल्यास त्या फिरल्या डोक्याच्या, नैतिकतेच्या-तर्काच्या ट्विस्टेड कल्पना असलेल्या, गुंतागुंतीचे व्यक्तिमत्व असलेल्या असतात. या असल्या लेखिकेचे शार्प ऑब्जेक्टस् हे पहिले पुस्तक. २००६ साली प्रकाशित झाले. त्यातले काही संवाद बघा:
• I am trash, from old money.
• My demons are not remotely tackled. They are mostly mildly concussed.
• You loooove dead girls.
• You survive.
• She paid for the sins of a mother she never met.
• If I say yes, you will think less of me or feel sorry?
• She is delicate, a rose but not without thorns.
• Good tree, bad apple.
• I never loved you.
• I thought you liked it rough.
या अशा पुस्तकावर तब्बल १२ वर्षांनी ही आठ भागांची मालिका आलीय. आणि माझ्या देवा! प्रतीक्षा खरंच worthwhile होती!!

जीन-मार्क वालेने अक्षरशः सोनं केलं आहे कथेचं. फ्लिनने स्वतः काही भाग लिहीले आहेत. मार्टी नॉक्सऑनने इतर भाग तेवढ्याच ताकदीने लिहीले आहेत. एडिटिंग स्वतः वालेने काही सहाय्यक वापरून केलं आहे. सगळ्यांचा अभिनय अतिशय उत्तम झाला आहे. एमी ऍडम्सबद्दलतर कितीही बोललं तरी कमीच पडेल.

कमीतकमी एकतरी कणखर स्त्री व्यक्तीरेखा असणारे, स्त्रियांची दुःखं, त्यांचा धुमसणारा राग, स्त्रीवाद वगैरेबद्दल भाष्य करणारे बरेच चित्रपट, मालिका आजकाल बनत असतात. They try to make some grand statement about woman and womanhood. शार्प ऑब्जेक्टसमधे तसं काहीही नाही. अडोरा, कमिल आणि ऍमा या तीन ठराविक बायका, त्यांची स्वतःची मानसिकता, जडणघडण, त्यांची एकमेकांसोबतची ट्विस्टेड नाती याबद्दलच भाष्य आहे.

वाचलेल्या अनेक लेखांपैकी एकातला समर्पक परिच्छेद देऊन थांबते.

Sharp Objects is outwardly realistic in every aspect, from its lived-in performances and atmospheric location shooting to its prismatic sound design and its nonlinear editing, which strives to replicate how the brain remembers and suppresses trauma. But in its heart, it’s a tragedy, a doom spiral about a damaged person slowly coming to terms with her damage, immersing herself in hell one last time and emerging, if not stronger, then alive, at least.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडे टीव्ही आणि केबल नाही पण तीच असणार.

Richard म्हणजे कॅन्सस सिटीचा होमिसाईड पोलीस आणि Vickery म्हणजे विंडगॅपमधला लोकल पोलीस.

मला हि सिरिज हाइप्ड, ओवररेटेड वाटली (एमी अ‍ॅडम्सचं अपरं नाक हा अपवाद Proud ). सायकॉलजीकल थ्रिलर म्हणाल तर फिंचरने बनवलेल्या सेवनच्या जवळपास हि जात नाहि...

स्टार वर्ल्डवर उद्या सोमवारपासून दररोज रात्री नऊ वाजता आहे ही मालिका आहे.
किती एपिसोड्स आहेत?
प्रिमीयरवर आठ होऊ थांबलंय बहुतेक

आठच एपिसोड आहेत. मिनी सिरीज आहे ही.

===
राज,
हो हाइप्ड, ओवररेटेड वाटू शकते काहीजणांना. तुम्ही कमिलशी कनेक्ट करू शकता कि नाही त्यावर अवलंबून आहे. बाकी तुलनेसाठी डायरेक्ट सेवनच आणावा लागला यातच बरेचकाही आले Wink

===
आता धागा वर आलाच आहे तर गुडरीड्सवरचे मला आवडलेले दोन रिव्ह्यू इथे नोंद करून ठेवते

https://www.goodreads.com/review/show/2480658?book_show_action=true&from...

Troy's review
Recommended for: anyone
Terrific book, truly creepy. A page turner about a journalist going back to her tiny Missouri home town to cover the recent murders of two little girls. Gillian Flynn's writing in Entertainment Weekly has always been a notch above, and her first novel is no disappointment.
What's remarkable about this book is that it focuses on some of the most damaged and interesting women I've ever seen in fiction. Strong women in fiction usually means one of three things:
1) Ass-kickers in fantastic outfits that talk, think and fight like men (think Tarantino)
2) Delicate little homebodies with surprising reserves of strength when needed (think Jane Austen)
3) Raging bitches (think Meryl Streep in The Devil Wears Prada)
What's great about the women here is that they don't really fit into any of the above categories. They're conniving, manipulative, sweet, deeply insecure, fierce and hopelessly crippled people whose flailing at one another feels very real and very scary. Great book.

https://www.goodreads.com/review/show/663470928?book_show_action=true&fr...

Pages