शहराकडून "बा" चा फून आला

Submitted by सिद्धेश्वर विला... on 27 September, 2018 - 04:53

शहराकडून "बा" चा फून आला

केल्या केल्या विचारू लागला

कोण टाकून गेला

लेंडूक आपल्या शेतामध्ये ?

म्या म्हटलं

माझ्याशिवाय हाय कोण इथं

तुमास्नी ह्ये कोण बोललं तिथं

"बा"ने घपकंन हासडून शिवी

लावली गाडीस चावी

निघाला परतीस गावाकडं

म्या बि धावलो धपाधप

लेंडूक शोधाया शेताकडं

घेता वास चहूकडं

नाक साफ चोंदून गेलं

च्या मारी माझ्या अपरोक्ष

कोण शेत शिंपून गेलं

घेतली कुदळ फावडी

कराया खाली वर माती

फुले पसरली चहुकडं

जागोजागी लावली उदबत्ती

सूर्य ढळाया लागला

चंद्रमा दिसाया लागला

कुदळ चालूच व्हती लेंडकांसाठी

अचानक एक इचार आला

रोम रोमांच उभा झाला

दुरुन एक गोटा आणला

शेंदूर तयास फासला

सांजवेळी गावात जाऊन

देव शेतात आल्याचा बोभाटा केला

लोकं धावली शेताकडं

कुणी पैके घेऊन तर कुणी फळ घेऊन

घालतं व्हती त्या गोट्यास साकडं

बा पुरता गोंधळून गेला

बघता बघता मिसळून गेला

येड्यावानी गर्दीमधी सैरभैर झाला

लेंडकामुळं शेतात आली लक्ष्मी

आता पुढचं वाढलेलं व्हतं

फक्त बसून खायचं व्हतं सात जन्मी

सिद्धेश्वर विलास पाटणकर

Group content visibility: 
Use group defaults

डोक्याची/ मेंदुची स्वच्छता करुन घ्या एकदा, बरिच घाण जमलेली दिसतेये, तसं काही देणं घेणं नाही, पण त्यातली काही माबोवर पण सांडते आहे म्हणुन सांगण झालं.

त्याच काय आहे आपल्या देशात कुठल्याही दगडाला ( तो आधी कुठे आणि कसा वापरला गेलाय याची शहानिशा ना करता ) शेंदूर फासला कि लोक हारतुर्रे घेऊन उभे राहतात . तेच माझ्या कल्पनेत एकाचे झालेले आहे . मला वाटत आपण गर्भितार्थ समजून ना घेता फक्त घाण वाचलीत . कुठलेही लेखन हे कल्पनेशिवाय सुचूच शकत नाही . आणि कल्पनाच नसेल तर प्रगती होऊच शकत नाही ...

सिद्धेश्वर, तुमचा मतीतार्थ बरोबर पोचला आहे कवितेतून.. नकारात्मक कमेन्ट्स कडे "लेंडूक" समजून काना- डोळा करा

कल्पना करा, तुम्हाला एका बगिच्यात जायचं आहे जिथे खुप छान फुलं आहेत, रंगिबेरंगी, सुगंधित, पण तिथे पोहोचायला जाणार रस्ता खुप लांब आहे, भयंकर घाणिने भरलेला आहे, जाणार का? आणि जाणारे किती असतिल. तोच जर रस्ता चांगला असेल तर जास्त लोक जाणार नाहित का.

नकारात्मक कमेन्ट्स कडे "लेंडूक" समजून काना- डोळा करा>> नकारात्मक कोमेंटस वरुन शिकण्यासाठी डोक्यात लेंडुक नसावं लागतं.

@ अग्निपंख
उदाहरण दिलेले पटलेलं नाही आहे . उगाच काहीतरी लिहायचं म्हणौन लिहिलेलं आहे .. लेंडूक समजून पाणी ओतण्यात आलेलं आहे . तुम्हाला उदाहरण द्यायचीच असतील तर दुसरीकडे द्या ,इथे माझ्या कल्पनेत नको , आणि अजून एक देणंघेणं ठेवण्यासाठी स्वतःच नाव पूर्णपणे माहित असणं आणि ते इथे या मंचावर लिहिणे याची हिम्मत असावी लागते . चोरून आणि कैक नावे धारण करून बरेच लोक बरेच चांगले वाईट उद्योग करतात त्यापैकी मी नव्हे . माझ्या कविता , माझं पूर्ण नाव मी छापत असल्याने माझे जवळचे नातेवाईक , माझी बायका मुलं कधीही वाचू शकतात . आंजा बनलेच आहे त्यासाठी , पण मी या परिणामांना कधी घाबरलो नाही आणि पुढेही घाबरणार नाही . जे दिसत आणि जस मी बघतो ते लिहीत राहणार...

गुड