गणेश स्तुती

Submitted by वैशाली अ वर्तक on 26 September, 2018 - 10:54

गणेश स्तुती ( अष्टाक्षरी ) 8/9/2018

गजानना गणराया

तुला प्रथम मोरया

मान तुझाच सर्वदा

आधी तुलाच वंदुया

शुभंकर तू सर्वांचाट

बाप्पा वाटे आपुला

तूचीअसे सुखकर्ता

किती नांवे रे तुजला

तूच असे दुःखहर्ता

ठेव कृपा दृष्टी सदा

हीच विनंती तुजला

नको करु कष्टी कदा

सर्व व्यापी असे तूची

तूची असे लंबोदर

महाकाय बुध्दीमान

जन वदती ओंकार

चौदा विद्या अवगत

तव महिमा अपार

अधिपती स्वामी तूच

कुणी म्हणती मंदार

अल्प मती आम्ही जन

काय वर्णू तव गुण

ठेवू श्रध्दा सदा मनी

आले तुजला शरण.

वैशाली वर्तक ......8/9/2018

Group content visibility: 
Use group defaults