प्रेमळ वाट

Submitted by Dev13 on 26 September, 2018 - 02:59

थोडं माझं ऐकून घेशील का
येऊन माझ्याजवळ डोळ्यात माझ्या पाहशील का
या डोळ्यांत फक्त प्रेम तुझ्यासाठी आहे
या मनाला तुझीच आस आहे
जीवाला ध्यास तुझाच आहे
माझ्या हृदयाची खास तूच आहेस
जबरदस्ती नाही ग माझी तुझ्यावर
तू माझ्यावर प्रेम करावं
माझं प्रेम स्वीकारावं
तुझ्या मनाला वाटेल ते कर पण
एकदाच माझ्या हाताला स्पर्श कर
आयुष्याभर तू सुखी रहावी
असं मनापासून वाटतं
मी तुला आवडत नाही पण
मला तुझ्यासोबत जगावं वाटतं
पण ते शक्य नाही
तुझ्या हाताचा स्पर्श असाच साठवून ठेवीन
तोच आठवत आठवत जगत राहीन
मी पडलो तुझ्या प्रेमात पण तू नाही
माझ्यामुळे खुप त्रास झाला असेल तर माफ कर मला
आयुष्यभर तुझ्या सुखासाठी देवाला रोज फुले वाहीन
तुला त्रास व्हायला नको म्हणून मी तुझ्यापासून दूर जाईन
पण शेवटपर्यंत तुझीच वाट पाहीन.....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users