बिग बॉस १२ : After padosis, it's time for jodis vs single

Submitted by अविका on 19 September, 2018 - 04:15

बिग बॉस १२ सुरु झाले आहे
मराठी बिग बॉसचे ईथे खुप चाहते होते
तसेच हिंदी बिग बॉस, खासकरुन सलमानच्या हॉस्टींगचे चाहते पण खुप आहेत
तर त्यावर चर्चा करायला हा धागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Submitted by दीपांजली on 22 October, 2018 - 22:08>>>
हाहाहा

मराठी bb मध्ये हर्षदा ना जस बोलवलं होत तस मेघा ला आणलय का???
कारण wildcard entry 2 जणांची झाली
पण नॉमिनेशन प्रक्रियेत फक्त मेघाच मत important होत..

Expert मेघाचं बोलणं ऐकून वाटत नाही की ती हा सीझन फॉलो करत नव्हती.. >>> अगदी हेच वाटलं. किंवा bb नी जे सांगितलं ते follow केलं.

मला जसलीन आणि श्रीशांतला nominate का नाही केलं असं वाटलं. ती सुरभी भयंकर चिडली.

मी मेघासाठी बघितलं पण फार आरडाओरडा, थयथयाट बऱ्याच जणांचा बघून मला ते राजेश रेशम सुशांत आस्ताद एका साईडला आरडाओरडा करायचे आणि विरोधी साईडला मेघा सई ते आठवलं. फार कलकलाट आहे, मी रोज नाही बघू शकणार.

मेघाची एन्ट्री मस्त झाली पण बरेच जण तिला ओळखत नाही याचं आश्चर्य वाटलं. मुंबईत राहणाऱ्या कलाकारांनी तरी ओळखायला हवं होतं.

कोण्या फॅनची ट्विट भारी होती !
मेघा दीपिकाकडून किचन, दीपकच्या टास्क स्ट्रॅटॅजिज, जस्लीनकडून मेकप डॉलचा किताब, सुरभिकडून जास्त बोलायचा किताब आणि श्रीसन्तकडून कॅमेरा फुटेज छिनने आयी है >>> सही Lol

मेघा फायनलला असेल पण जिंकेल असं नाही वाटत. दुसरी किंवा तिसरी येऊ शकते.

Rohit Suchanti
नाव त्याच..

मेघाने काय एंट्री मारली आणि कसला ताबा घेतला आल्या आल्या, सुरभिला कंट्रोलमधे घेतलं डायरेक्ट Uhoh
बरोब्बर गेस मारला मी, ती मेघा आहे, मोठ्या सेलेब्जच्या गर्दीत नाही उभी रहाणार, रोमिल सारख्या शातिर कॉमनर्सना जॉइन करून तिथे लिड घेणार !
सुरभि सुध्दा थोडी कंट्रोलमधे आली तर ती आणि मेघा जबरी पंगे घेतील !
फक्त इथेही सुरभि - रोमिल कुठल्याही क्षणी सई पुष्कि बनु शकतात , कोणी कोणाचं सख्खं नाहीये :).

<<<मेघा दीपिकाकडून किचन, दीपकच्या टास्क स्ट्रॅटॅजिज, जस्लीनकडून मेकप डॉलचा किताब, सुरभिकडून जास्त बोलायचा किताब आणि श्रीसन्तकडून कॅमेरा फुटेज छिनने आयी है<< लई भारी Lol Lol

पण तुम्हाला कोणाला अति कलकलाट करतात असे वाटलं नाही का काल, कित्ती भांडतात केवळ नॉमीनेट झाले तर. फक्त मेघासाठी बघितलं काल पण टास्कव्यतिरिक्त एवढा कलकलाट, आरडाओरडा बघून डोकं उठलं माझं.

त्या टोकदार मिशिवाल्याने दाढी मिशी काढली का, काल मी खूप वेळ ओळखलं नाही त्याला, कोण आहे हा विचार करत राहिले, मग ट्युबलाईट पेटली माझी.

<<पण तुम्हाला कोणाला अति कलकलाट करतात असे वाटलं नाही का काल, कित्ती भांडतात केवळ नॉमीनेट झाले तर. फक्त मेघासाठी बघितलं काल पण टास्कव्यतिरिक्त एवढा कलकलाट, आरडाओरडा बघून डोकं उठलं माझं.<<
सुरवातीपासुनच आहे हे अन्जु. म्हणुन मी बघणे सोडुन दिले होते. आता मेघासाठी खास बघितले काल.

मलाही इरीटेट होते ते. सुरभी, खान भगिनी, रडुबाई सृष्टी, श्रीशान्त , त्याच्या मागे मागे श्री श्री करणारी दिपिका, आणि तो दिपक.. त्याचा आवाज, असह्य बडबड ... सगळ्च असहनिय आहे.

<फक्त मेघासाठी बघितलं काल पण टास्कव्यतिरिक्त एवढा कलकलाट, आरडाओरडा बघून डोकं उठलं माझं.>
सेम अन्जुताई..
रोज बघणे होईल असे वाटत नाही. मेघा मात्र नेहमीप्रमाणे मस्त फॉर्मात आहे. तिच्यासाठी पहावे लागेल.

ओहह छान लिहिलंयस आर्या. मी नाही बघू शकणार, मेघा असली तरी. मराठीतपण त्रास व्हायचा मला, मग मी mute करून ठेवायचे. रा रे सु आ विरुद्ध मे स जाम कलकलाट करायचे आणि ती जुई किरकिर करायची Lol .

काल मेघाने रेशम सईला मस्त tont मारला की बेडवर पडून पडून जिंकता येत नाही शो.

मला जसलीनपेक्षा सृष्टी आवडते. श्रीसंत काल शांत होता सुरभी राडा करत होती तेव्हा, कुल. डोक्यावरची पाटी दाखवत होता. मलापण खान सिस्टर्स, सुरभी, श्रीशांत, अनुप जसलीन नाही फार आवडत. तसं कोणीच नाही आवडत फार पण दीपिका, सृष्टी, नेहा बरे वाटायचे. आता मेघाला सपोर्ट पण बघणार नाही.

रोज बघणे होईल असे वाटत नाही. मेघा मात्र नेहमीप्रमाणे मस्त फॉर्मात आहे. तिच्यासाठी पहावे लागेल. >>> हो तिच्यासाठी वाटतंय बघावं पण नाही बघणार. काही चांगलं असेल तर लिहा, voot वर बघेन. तिथे खाली चौकोन येतात त्यात सीन कुठला समजतं, म्हणजे तेवढं बघता येतं. फाफटपसारा नको बघायला Lol

इनफॅक्ट त्यान्च्यातल्या त्यान्च्यात सुद्दा कोल्जड ग्रुप दिसत नाहीत अजुन. अजुनही सिन्गल/ जोडीनेच खेळत आहेत.

मेघाला इथे कुणी 'सई' भेटेल की नाही शन्काच आहे. आणि नकोच भेटाय्ला. नको तिथे एनर्जी वाया घालवते मग ती.
पण हो, ग्रुप मिळायला हवा चान्गला. ग्रुपचा सपोर्ट रहातो.

त्या सईबाई आधी task वगैरे छान करायच्या पण आळशी खूप. सारखी आजारपणं, बेडवर पडून फक्त कॅप्टन झाल्या की बाईसाहेब टुकटुकीत असायच्या, तेव्हा आजारी नाही पडायच्या. त्या मेघामुळे सई चौथी तरी आली नाहीतर बाहेर पडली असती आधीच आणि ती रेशम तर काय channel कृपेने गेली एवढी तरी पुढे.

मलाहि खुप काल गोड धक्का बसला तिला तिथे पाहुन अन प्रतिस्पर्धी बनुन आली म्हणुन जास्तच.. खरच मध्ये कंटाळा आसा होता बिग बॉ बघण्याचा Happy

मेघा चा जलवा सुरु झाला वाटत......अचानक हा धागा पळायला लागलाय कालपासुन+11
Just saw today's sneak peek on voot .. मेघाच मेघा दिसतेय फुल ,बाकी सर्व गुल

आली आली आपली मेघा आली !!
कालच्या एपिसोड मुळे जान आली BB12 मध्ये . काय करते आता बघूया हिंदी मध्ये !

झालं! आता मेघाची काळजी करणं आलं परत एकदा!
Submitted by राया on 22 October, 2018 - 12:59 >>> अगदी अगदी

इथं मेघाला व्हिलन म्हणून प्रोजेक्ट करतायंत असं दिसतंय. तीन चार दिवस गेले आणि ती जरा रूळली की मग कळेल तिला किती सपोर्ट आहे ते.
बाकी, ती पाहूणी असणार असा माझा कयास आहे.

बाकी, ती पाहूणी असणार असा माझा कयास आहे >>>> मला पण तसच वाटतय .सर्वांंन्ना reality check आणि push करायला पाठवल असेल तिला. bdw हे celibrity किती बमालूम पणे खोट बोलतात परवा म्हणत होती मेघा की हा सीज़न फोल्लो नाही केला पण सर्वाना सल्ले देताना तस काही वाटल नाही ..

नाही, मी आधीही म्हंटलय तसं मेघा गेस्ट नाहीये, प्रॉपर वाइल्ड कार्ड आहे, हे अगदी डायरेक्ट तिच्याच सोर्स ने सांगितलय !

आता इथे मेघा हेटर्स च पण चालु होईल Happy
मलाहि खुप वाटत होतं तिला इथे आणाव.. पण खरच खुप हुषार आहे ती.. इतक्या जणातुनहि कळतय.. सगळे तसे धसकलेत तिच्या येण्याने.. Happy

मेघा हेटर्स >>>> मी आहे त्यात , पण तरी मला तीने हिंदी सिझन जिंकलेली आवडेल. शेवटी ती तीथे मराठी कलाकार अन त्यातही एक विनर बनुन गेलीये. सो आतातरी मला तिनेच जिंकावे असे वाटते.

कालचा भाग पाहिला...
बाकी लोकांची कावकाव फारच आहे त्यामुळे मेघा ला काल फार स्कोप नाही मिळाला असं वाटलं..त्यातही तिचे प्रयत्न चालु होतेच अधुन मधुन Wink
बाकी मेघा मनातल्या मनात नक्की म्हणाली असेल की मराठी बीबॉ बरं होतं ;-)...
पण तरी मेघा चे " गुड मॉर्निंग बिग बॉस" ऐकायला मस्त वाटलं परत खुप दिवसांनी Happy

<<बाकी लोकांची कावकाव फारच आहे त्यामुळे मेघा ला काल फार स्कोप नाही मिळाला असं वाटलं..त्यातही तिचे प्रयत्न चालु होतेच अधुन मधुन Wink<<, exactly... आणि मधुनच आल्याने मिसळायला अजुन वेळ लागेल असे वाटतेय.
काल कुठेतरी एका कोपर्यात बसुन डोळे फिरवताना दिसली. एकेकाचा अन्दाज घेत असावी.

मेघा जिंकेल असं मला वाटत नाहीये, जिंकावी असं वाटतंय पण चान्सेस फार कमी आहेत. हा platform मोठा आहे फार. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरच्या बऱ्याच जणांचे प्रेम तिला मिळाले असले तरी देशात बरेच जण तिला ओळखत नाही. बरेच जण youtube वर विचारतायेत ही कोण मग मराठी follow करणारे त्यांना उत्तर देतायेत.

Btw मी बघत नाहीये पण youtube वर नजर ठेवतेय, दोन चार मिनिटांचे review असतात ते बघते.

Pages